Surya Rashi Parivartan 2023 : ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यदेवाला पितृत्वाचा कारक मानलं गेलंय. ज्योतिषशास्त्र सूर्य दर 30 दिवसांनी एकदा आपली राशी बदलतो. सूर्य देव 12 महिन्यांत सर्व 12 राशी पूर्ण करतो.
सध्याच्या काळात सूर्य देव कन्या राशीत भ्रमण करत असून नवरात्रीच्या काळात म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.
कन्या राशीतील सूर्याचं गोचर तुमचे करिअर, उत्पन्न आणि आर्थिक स्थिती सुधारू शकते. तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुमच्या नात्यात आनंद आणि सुसंवाद वाढेल. या काळात तुम्हाला व्यवसायात यश मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीमध्ये नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
तूळ राशीतील सूर्य देवाचं गोचर धनु राशीसाठी खूप फलदायी मानलं जातं. या काळात करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. धनु राशीच्या उत्पन्नाच्या घरात सूर्याच्या उपस्थितीमुळे लोकांच्या करिअर आणि व्यवसायाला गती मिळेल. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने विशेष आर्थिक लाभ मिळेल. या काळात तुम्हाला व्यवसायात भरपूर धनलाभ होईल.
मकर राशीतील सूर्यदेवाच्या गोचरमुळे तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहेत. या काळात तुमच्या करिअरमध्ये यश आणि स्थिरता येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या मित्र किंवा नवीन क्लायंटसोबत व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवण्याची संधी मिळेल
सूर्य देव तूळ राशीत असल्यामुळे कुंभ राशीसाठी हा काळ शुभ मानला जातो. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल. ही वेळ पैसे कमवण्यासाठी चांगली आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठीही वेळ शुभ राहील. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)