Surya Guru Yuti 2023 : 12 वर्षांनंतर सूर्य-गुरूचा अद्भुत संयोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Sun Transit 2023 : ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग जुळून येतं असतात. जेव्हा दोन ग्रह एका राशीत भेटतात त्याला संयोग म्हणतात. असाच संयोग 12 वर्षांनंतर सूर्य आणि गुरुचा जुळून आला आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 22, 2023, 07:21 AM IST
Surya Guru Yuti 2023 : 12 वर्षांनंतर सूर्य-गुरूचा अद्भुत संयोग, 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत? title=
surya guru yuti 2023 after 12 years surya gochar 2023 sun transit in taurus will give immense money these zodiac signs

Surya Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह परिवर्तनामुळे मनुष्याचा जीवनावर त्याचा परिणाम दिसून येतो. ग्रहांच्या उदय आणि अस्तमुळे अनेक योग जुळून येतात. काही योग मनुष्याला धनवान बनवतात तर काहींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. असाच महासंयोग तब्बल 12 वर्षांनी जुळून आला आहे. सूर्य आणि गुरु यांची युती बनणार आहे. त्यामुळे याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी तो अतिशय शुभ ठरणार आहे. (surya guru yuti 2023 after 12 years surya gochar 2023 sun transit in taurus will give immense money these zodiac signs)

'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

कर्क (Cancer)

सूर्य आणि गुरुची युती कर्क राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. नवीन गाडी खरेदीचा योग आहे.  या काळात सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने असतली. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी गुरु सुर्य संयोग हा शुभ ठरणार आहे.  सरकारी नोकरीची उत्तम संधी मिळणार आहे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीही हा सगळ्यात चांगला काळ ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांना नशीबाची साथ काय असतं ते या काळात कळणार आहे. विरोधकही आपले सगळे तंत्र सोडून तुमच्यासोबत उभे राहतील. नोकरीत घवघशीत यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जुने कर्ज तुम्ही फेडू शकणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठाल. कोर्ट कचेरीतील प्रकरण तुमच्या बाजूने लागेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा शुभ काळ असणार आहे. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदीचे उत्तम संयोग जुळून आला आहे. अगदी वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला लाभ होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. 
 

वृषभ (Taurus)

सूर्य गुरुच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातून आनंदाची बातमी मिळणार आहे. मालमत्तेतून उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा उत्तम काळ ठरणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)