Surya Nakshatra Gochar : सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; 'या' राशी होणार मालामाल!

Surya Nakshatra Gochar : सूर्य देव ग्रह दर महिन्याला आपली राशी बदलतात. 20 जुलै 2023 रोजी सूर्य आपलं नक्षत्र बदलून पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 20, 2023, 07:14 AM IST
Surya Nakshatra Gochar : सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; 'या' राशी होणार मालामाल! title=

Surya Nakshatra Parivartan 2023 in Pushya Nakshatra: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. अशा सूर्य देव ग्रह दर महिन्याला आपली राशी बदलतात. त्याचप्रमाणे सूर्य नक्षत्रही वेळोवेळी गोचर करत असतात. 

16 जुलै 2023 रोजी सूर्य देवांनी कर्क राशीत प्रवेश केलाय. तर आज 20 जुलै 2023 रोजी सूर्य आपलं नक्षत्र बदलून पुष्य नक्षत्रात प्रवेश केला आहे. पुष्य नक्षत्रातील सूर्याचे गोचर करुणा, नेतृत्व, उदारता, भावनिक स्थिरता यांसारख्या शुभ गुणांना चालना देईल. सूर्याचे राशीचे गोचर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत?

मेष रास

मेष राशीतील सूर्याचं गोचर मेष राशीच्या राशीच्या लोकांना खूप लाभदायक ठरणार आहे. या लोकांच्या जीवनात सुख-सुविधा वाढणार आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहणार असून घरगुती बाबींसाठी काळ चांगला आहे.

मिथुन रास

पुष्य नक्षत्रात सूर्याच्या प्रवेशामुळे मिथुन राशीच्या लोकांचं कौशल्य वाढणार आहे. यावेळी या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार आहे. तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. महत्त्वाच्या कामामध्ये कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. 

वृश्चिक रास

सूर्याच्या राशीतील बदलामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना चांगला फायदा होणार आहे. यावेळी तुमच्या मनात सकारात्मक विचार येणार आहेत. आव्हानांवर प्रभावीपणे मात कराल. वडील आणि गुरूंचे महत्त्वाचे मार्गदर्शन मिळू शकतं.

धनु रास

सूर्याचे नक्षत्र गोचर धनु राशीच्या लोकांना अपार सुख आणि समृद्धी देणार आहे. तुम्ही एक अद्भुत जीवन जगू शकणार आहात. प्रॉपर्टीशी संबंधित फायदे मिळू शकतात. 

मीन रास

सूर्याचे गोचर या राशींच्या व्यक्तींना मोठी कीर्ती मिळवण्यास फायदेशीर करू शकते. करिअरमध्ये तुमची प्रगती होईल. खेळाशी संबंधित लोकांना फायदा होईल.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )