Horoscope 20 July 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी व्यापारात मोठ्या गुंतवणूकीचा विचार टाळावा!

Horoscope 20 July 2023 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

सुरभि जगदीश | Updated: Jul 19, 2023, 11:22 PM IST
Horoscope 20 July 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी व्यापारात मोठ्या गुंतवणूकीचा विचार टाळावा! title=

Horoscope 20 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी केलेल्या कामात अपेक्षेनुसार मिळणार नाही. आर्थिक हानी संभवते. विद्यार्थ्यांकडून अभ्यासात प्रगती होईल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी जोडीदारांकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. नावलौकिक प्रसिद्धिसाठी अधिक पैसा खर्च कराल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. स्पर्धा परिक्षेत प्राविण्य मिळेल. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी स्वभावात चिडचिडेपणा निर्माण होईल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळणार आहे. सुख चैनीच्या वस्तूत खर्च वाढेल.

सिंह (Leo)

आजच्या दिवशी शारिरिक थकवा जाणवेल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत कोणावर विसंबून राहू नका. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक पातळीवर परिवाराची साथ मिळाल्याने समाधानी राहाल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी रोजगारात आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. संकुचित मनोवृति टाळावी. मनाजोग्या काही आनंदाचा घटना घडू शकतील

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी कामात यश आल्याने आपले मनोधर्य उंचावेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील.  दुरवरचे प्रवास हितकारक ठरतील.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी आरोग्यावरील खर्चात वाढ होईल. वरिष्ठांकडून कामाचा दबाब राहील. आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी वरिष्ठांसोबतच्या विचारात मतभेद निर्माण होऊ शकतात.  व्यापारात मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी व्यापार रोजगारात प्रश्न मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात नवीन मार्ग सापडतील.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )