Todays Panchang : आज स्वामी समर्थ प्रकट दिन; पाहून घ्या आजच्या दिवसाचं पंचांग

Todays Panchang : दिवस सगळेच शुभ असतात. फक्त तुमची बुद्धी सकारात्मकतेकडे झुकणारी हवी. पंचागातून आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या वेळा अधोरेखित करण्यात आल्या आहेत. पाहा...   

Updated: Mar 23, 2023, 06:37 AM IST
Todays Panchang : आज स्वामी समर्थ प्रकट दिन; पाहून घ्या आजच्या दिवसाचं पंचांग
Swami Samarth Prakat Din 2023 panchang 23 march 2023 thursday mahurat astro news

Todays Panchang : आज गुरुवार आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. महाराष्ट्रच नव्हे, तर देशोदेशीच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत त्यांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करणाऱ्या स्वामींचरणी आज सर्वजण नतमस्तक होत आहेत. असं असतानाच आजच्या दिवसातील काही वेळा अतिशय शुभही आहेत. पंचांगामध्ये याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. 

आजचा दिवस आणखी एका कारणानं खास, म्हणजे आज चैत्र नवरात्रोत्सवातील दुसरा दिवस. आजच्या दिवशी देवीपुढं,

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू। 

देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥  या मंत्राचा जप करावा. चैत्र नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रुपाची पूजा होत आहे. ही ज्ञान आणि तपश्चर्येची देवी आहे असंही म्हटलं जातं. अशा या मंगल दिवसाचं पंचांग आपण पाहूया... (Swami Samarth Prakat Din 2023 panchang 23 march 2023 thursday mahurat astro news)

हेसुद्धा वाचा : Horoscope 23 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी!

आजचा वार - गुरुवार     

तिथी- द्वितीया

नक्षत्र - रेवती

योग - इंद्रा   

करण- बालव, कौलव

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:22 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06.33 वाजता

चंद्रोदय -  07:21

चंद्रास्त - 20:23

चंद्र रास- मीन     

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त– 10:26:11 पासुन 11:14:57 पर्यंत, 15:18:47 पासुन 16:07:33 पर्यंत

कुलिक– 10:26:11 पासुन 11:14:57 पर्यंत

कंटक– 15:18:47 पासुन 16:07:33 पर्यंत

राहु काळ– 13:59:32 पासुन 15:30:58 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम– 16:56:19 पासुन 17:45:05 पर्यंत

यमघण्ट–07:11:07 पासुन 07:59:53 पर्यंत

यमगण्ड– 06:22:21 पासुन 07:53:48 पर्यंत

गुलिक काळ–  09:25:14 पासुन 10:56:40 पर्यंत

शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त - 12:03:43 पासुन 12:52:29 पर्यंत

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल - मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती, अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा

वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)