Shash Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्तानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. असंच यंदाच्या वर्षी मकर संक्रातीलाअतिशय शुभ योगायोग घडला होता. तर दुसरीकडे शनिदेव 30 वर्षांनी कुंभ राशीत विराजमान झाले आहेत. यावेळी शनी देवांमुळे शश राजयोग तयार झाला आहे. शनी देवांच्या या शश राजयोगामुळे अनेक राशींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. यावेळी अपूर्ण काम पूर्ण होईल आणि नशीबही साथ देणार आहे. जाणून घेऊया या राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना कलाटणी मिळणार आहे.
मेष राशीच्या लोकांना या शुभ राजयोगाचा लाभ मिळेल. तुमच्या दबलेल्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही करत असलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. करिअरबद्दल बोलायचे झाले तर शुभ योगामुळे तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण मिळणार आहे. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळतील.
वृषभ राशीच्या लोकांना या शुभ योगाचा लाभ मिळेल. तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील आणि गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. या राशीच्या व्यावसायिकांवर शनीची कृपा असणार आहे. व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे. या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल. जुन्या कर्जातूनही सुटका मिळेल.
या राशीच्या व्यक्तींना 30 वर्षांनी तयार होणाऱ्या शुभ योगाचा लाभ मिळेल. कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळेल. तुम्हाला उत्पन्नाच्या इतर स्रोतांची माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. प्रेम जीवनात असलेल्यांसाठी हे उत्तम असेल, तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या प्रेम जोडीदाराबद्दल सांगू शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांना या शुभ योगाचा लाभ मिळेल. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल किंवा परदेशात प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. कौटुंबिक जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )