Bhadra Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. यावेळी ग्रहांच्या या राशीबदलामुळे अनेकदा शुभ योग तयार होतात. येत्या काळात बुध ग्रह तब्बल एका वर्षानंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे.
बुध ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशामुळे भद्र राजयोग तयार होईल. कुंडलीत बुध ग्रह स्वत:च्या राशीत किंवा उत्तम राशीत असताना भद्रा राजयोग तयार होतो. ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा योग फायदेशीर मानला जातोय. या योगाच्या प्रभावामुळे 3 राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे. जाणून घेऊया भद्र राजयोग कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
भद्र राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. बुध ग्रह चौथ्या भावात भ्रमण करणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद सुरू असेल तर तो सोडवला जाऊ शकतो. घरगुती प्रकरणांमध्ये सुरू असलेला तणाव दूर होईल. तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत लाभ होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी भद्र राज योग लाभदायर ठरणार आहे. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून धन गृहात संचार करणार आहे. यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. या काळात तुम्हाला रखडलेले पैसे मिळू शकतात. तुम्ही उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीद्वारे पैसे मिळू शकतात. एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
भद्र राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीतून सातव्या भावात भ्रमण करतोय. या काळात तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात. तुमच्या करिअरच्या संदर्भात उत्तम संधी मिळू शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. यापूर्वी असलेल्या वादग्रस्त प्रकरणात यश मिळणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )