मेष- मित्रपरिवार आणि कुटुंबीयांची साथ मिळेल. विचाराधीन कामं पूर्ण होतील. संपत्तीचे व्यवहार मार्गी लागतील. नवी कामं सुरु करण्याची संधी आहे. वैयक्तित जीवनाची काळजी घ्या. जोडीदारासाठी वेळ काढा.
वृषभ- कोणा एका नकारात्मक विचाात अडकू नका. मोठी संधी गमावाल. लगेचच निष्कर्ष काढू नका. आरोग्याची काळजी घ्या आज धनलाभ होण्याचा योग आहे.
मिथुन- अडचणींवर मात करण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. नव्या संधी तुम्हाला नव्या आसमंतात नेतील. दैनंदिन कामंही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अडचणी दूर होतील.
कर्क- प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमजुतींमुळे तणावाची परिस्थिती उदभवू शकते. निष्काळजीपणा करु नका. धनलाभाचा योग आहे, पण, सजग राहा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह- विचाराधीन कामं पूर्ण होण्यास काही अडचणी येतील. नवी संकटं समोर उभी ठाकतील. आज कोणतेही बेत आखू नका. कामात मन रमणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या- व्यापाराच्या बाबतीत काही नव्या संकल्पनांवर काम सुरु कराल. साथीदाराची साथ अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. अपूर्ण कामं मार्गी लावण्याचा विचार करा. मन प्रसन्न असेल.
तुळ- आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आणि लाभदायी आहे. नव्या संधी मिळतील. त्यातूनच धनलाभाचा योग आहे. प्रकृती उत्तम असेल.
वृश्चिक- नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत विचाराधीन कामं पूर्ण होतील. नुकसानही होईल. अवाजवी खर्च होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
धनु- आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होईल. आरोग्याची काळजी घ्या. संतानसुख मिळेल. नोकरीमध्ये काही अडचणी येतील. पण, त्यावर मात कराल.
मकर- आज दिवसभर सावधगिरी बाळगा. काही लोकं आपल्या स्वार्थासाठी तुमचा वापर करु पाहतील. वास्तविकता लक्षात घ्या.
कुंभ- आज तुम्ही आखलेले बेत यशस्वी होतील. अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. अडचणी दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- व्यापारामध्ये काही फायदे होणार आहेत. अडचणी वाढतील. पण, त्यावर तोडगाही निघेल. तणावाची परिस्थिती वाढेल. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये हलगर्जीपणा नको.