आजचे राशीभविष्य | ९ नोव्हेंबर २०१९ | शनिवार

जाणून घ्या तुमचे भविष्य 

Updated: Nov 9, 2019, 08:33 AM IST
आजचे राशीभविष्य | ९ नोव्हेंबर २०१९ | शनिवार

मेष - आपला स्वभाव जरी मजा, मस्तीचा असला तरीही आज तुम्ही तुमच्या खासगी जीवनाकडे लक्षकेंद्रीत करा. याचा भविष्यात तुम्हाला फायदा होईल. चांगली संधी चालून येणार आहे. जोडीदाराची याकरता मदत होईल. 

वृषभ - आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्हाला तणाव जाणवेल. मग तो तणाव कामामुळे असेल किंवा प्रिय व्यक्तीमुळे असेल. आजकरता महत्वाचा सल्ला म्हणजे डोक्यात जे काही सुरू आहे ते थांबवण्याचं काम करा. लोकांना समजून घेण्याचा विचार करा. 

मिथुन - तुम्हाला असं वाटतंय का? की तुमच्या आजूबाजूची गोष्ट निसटत आहे. याकडे लक्ष द्या. नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. सकारात्मक गोष्टी आणि सकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात राहा. 

कर्क - अशी कोणतं गोष्ट आहे ज्याची अपेक्षा तुम्ही करताय पण तसं घडत नाही आहे. आज पुढे जाण्याचा दिवस आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाकडे लक्ष केंद्रीत करा. 

सिंह - आज तुम्हाला मानसिक ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तुमचं मन काय आहे? आणि काय होऊ शकतं? यामध्ये गुंतल आहे. मन शांत ठेवण्याचा विचार करा. चांगल्या गोष्टीत स्वतःला गुंतवा. 

कन्या - विद्यार्थ्यांकरता आजचा महत्वाचा दिवस आहे. नवीन शिकण्याचा विचार करत असाल तर आजचा चांगला दिवस आहे. खेळात किंवा इतर कामात यश मिळेल. 

तूळ - आजचा दिवस ताण-तणावाचा आणि वादाचा असेल. मौन ही गोष्ट आज धारण कराल. कामात स्वतःच मन गुंतवा. जोडीदारासोबत वेळ घालवा. 

वृश्चिक - तुमच्या परिवारात आज कुणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे. यामुळे दिवस चिंतेत असेल तर हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला कठोर होऊन कुटुंबाला आधार द्यावा लागेल. 

धनू - आज खूप गडबडीचा दिवस आहे. मग तो कामावर आणि घरात असा दोन्हीकडे असेल. त्यामुळे वेळ काढून आणि लक्ष देऊन सगळी काम कराल. याचा सर्वाधिक लाभ होईल. 

मकर - आज रोमान्सचा मूड नसेल पण तुमचा जोडीदार असेल. त्यामुळे सुवर्णमध्य साधा. आराम करण्याचा दिवस आहे जास्त स्वतःला कामात गुंतवू नका. मन चांगल्या गोष्टीत रमवा. 

कुंभ - ज्या लोकांना खूप दिवस भेटला नसेल त्यांच्या आज गाठीभेटी होतील. प्रवास होण्याची चिन्हे आहेत. कामात लक्ष द्या. 

 मीन - स्वतःला आज कामात व्यस्त करून घ्याल. सार्वजनिक क्षेत्रातही तुमची उपस्थिती असेल तसेच कुटुंबासोबत व्यस्त राहा. मन प्रसन्न असेल त्यामुळे क्षीण जाणवणार नाही.