राशीभविष्य: 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ

कोणत्या राशीसाठी आजचा दिवस शुभ जाणून घ्या  

Updated: Jun 4, 2021, 07:06 AM IST
राशीभविष्य: 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ

मेष- आज महत्त्वाच्या कामांसाठी आपली ऊर्जा खर्च करा. महत्त्वाची कामं मध्यभागी अडकतील. ज्या गोष्टी माहिती नाहीत अशांवर टीका किंवा बोलणं टाळा. नवी संधी मिळण्याची शक्यता. विचार करून निर्णय घ्या. 

वृषभ- कामात यश मिळेलं. मन प्रसन्न राहिल. करमणुकीसोबत खेळाचा समावेश केला तर दिवस उत्तम जाईल. आज पैसे खूप खर्च होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या. आज आपल्या प्रेमाला एक सुंदर वळण मिळेल.

मिथुन - अनेक दिवसांपासून अडलेली कामं आज मार्गी लागतील. अडकलेली कर्जाची कामं सुरळीत होतील. आजचा दिवस आनंदी आणि चैतन्यमय असणार आहे. आज वैवाहिक दृष्टिकोनातून आपल्याला काही अनोख्या भेटवस्तू मिळू शकतात.

कर्क- काम आणि घर दोन्हीमध्ये कसरत होईल. त्यामुळे आज आपल्याला तणावाचा सामना करावा लागेल. पैसे साठवण्यावर अधिक भर द्यायला हवा. आज कुटुंबियांना आनंदाची बातमी मिळेल. 

सिंह- आपला आजार बरा होऊ शकतो. पैसे आणि आपल्याकडे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आज खूप जपून ठेवा. आज आपल्या राशीचे ग्रह चांगले नाहीत त्याचा परिणाम होऊ शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. नियोजन करून कार्य करा. 

कन्या- करमणुकीसोबत खेळाचा समावेश केला तर दिवस उत्तम जाईल. आज पैसे खूप खर्च होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या. आज आपल्या प्रेमाला एक सुंदर वळण मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. अनेक काळापासून उद्भवत असलेली समस्या आज सोडवा.

तुळ- सकारात्मक विचार करा. ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका. आज खूप कसरत करावी लागू शकते. 

वृश्चिक- विश्रांती घेण्यासाठी आज वेळ मिळेल. आपल्या दृढ आत्मविश्वासामुळे काम सोपं होईल. आजची संध्याकाळ मित्र-मैत्रिणींसोबत जाईल. 

धनु- आज तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. आज आपल्याला ताण येऊ शकतो. कर्जाची परतफेड आजच करा. वाद आणि टीकेचा सामना करावा लागेल.

मकर- चांगल्या गोष्टी स्वीकारण्याकडे आज आपला कल असेल. जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. आज खर्चावर नियंत्रण न राहिल्यानं बजेट कोलमडेल.

कुंभ- मानसिक ताण आणि कटकटीपासून दूर राहा. आज आर्थिक चणचण जाणवू शकते. मित्रांकडून योग्य सल्ला मिळेल. नव्यानं प्रेमात पडण्याची सवय धोक्याची ठरू शकते. 

मीन- आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आज आपल्याला ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आज आपलं मन लागणार नाही.