आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ  आज भाद्रपद शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...      

नेहा चौधरी | Updated: Sep 12, 2024, 12:24 PM IST
आजचे पंचांग, 12 सप्टेंबर 2024: आज गौरी गणपती विसर्जनाला आयुष्यमान योग! जाणून घ्या विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ  title=
thursday panchang 12 September 2024 panchang in marathi ganeshotsav gauri Ganpati visarjan

Panchang 12 September 2024 in marathi : आज गौरी विसर्जन असणार आहे. गौरीसह गणपतीच विसर्जन करण्यात येईल. पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता गौरी गणपतीला निरोप दिला जाणार आहे. 6 दिवसांच्या पाहुणचारानंतर गौरी गणपती परतीचा प्रवास करणार आहेत. भक्त पुढल्या वर्षी लवकर या अशा जयघोष करत त्यांना निरोप देणार आहेत. अशात गौरी विर्सजनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र धनु राशीत आहेत. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. गणेशोत्सवातील गणेशासह आज गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ आणि साईबाबांची उपासना करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 12 September 2024 panchang in marathi ganeshotsav Gauri Pujan) 

गौरी विसर्जन शुभ मुहूर्त 

12 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करायचे असून रात्री 10 पर्यंत म्हणजे दिवसभरात कधीही गौरी विसर्जन करु शकतो.

पंचांग खास मराठीत! (12 September 2024 panchang marathi)

वार - गुरुवार
तिथी -  नवमी - 23:34:54 पर्यंत
नक्षत्र - मूळ - 21:53:22 पर्यंत
करण - बालव - 11:47:51 पर्यंत, कौलव - 23:34:54 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - आयुष्मान - 22:40:23 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:04:42
सूर्यास्त -18:29:13
चंद्र रास - धनु
चंद्रोदय - 14:18:59
चंद्रास्त - 24:22:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:24:30
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:12:52 पासुन 11:02:30 पर्यंत, 15:10:40 पासुन 16:00:18 पर्यंत
कुलिक – 10:12:52 पासुन 11:02:30 पर्यंत
कंटक – 15:10:40 पासुन 16:00:18 पर्यंत
राहु काळ – 13:50:01 पासुन 15:23:05 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:49:56 पासुन 17:39:34 पर्यंत
यमघण्ट – 06:54:21 पासुन 07:43:59 पर्यंत
यमगण्ड – 06:04:42 पासुन 07:37:46 पर्यंत
गुलिक काळ – 09:10:50 पासुन 10:43:54 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:52:08 पासुन 12:41:46 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)