मुंबई : रक्षा बंधन म्हणजे राखी पौर्णिमा. हा सण बहिण-भावाच्या अतूट नात्याचा सण मानला जातो. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसंच आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन भाऊ आपल्या बहिणीला देतो.
हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. म्हणूनच याला राखी पौर्णिमा म्हणलं जातं. तर आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण रक्षाबंधनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
हिंदू पंचागांनुसार राखीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग घडत असतात. सकाळी मागणी आणि सर्वार्थ सिद्धी योग होता. सकाळी 10:34 वाजता शोभा योग आणि संध्याकाळी 07:40 वाजता धनिष्ठ नक्षत्र योग आहे. राखीच्या दिवशी राहूकाल आणि भद्राकाल दरम्यान राखी बांधू नये. या काळात राखी बांधणं अशुभ मानले जातं.
पंचांगानुसार, राहुकाल संध्याकाळी 05:05 ते संध्याकाळी 06:39 पर्यंत असेल. राहुकालच्या दिवशी कोणतंही यशस्वी काम केलं जात नाही. पौराणिक मान्यतेनुसार, त्रेतायुगात, रावणाने आपल्या बहिणीला राहुकालमध्ये राखी बांधली. तेव्हापासून त्याच्या वाईट वेळेला सुरूवात झाली. पंचांगानुसार, भद्रा आणि राहू दोन्ही अशुभ मानले जातात.
येन बुद्धो बलि: राजा दानवेंद्रो महाबल|
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल||
या श्लोकानुसार, बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधताना म्हणते, की मी तुला त्याच संरक्षण धाग्यात बांधते ज्यामध्ये महान राजा बाली बांधला होता. ही राखी, ठाम राहा. आपल्या बचावाच्या संकल्पाने कधीही विचलित होऊ नको. या मागणीने बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात.
राखीच्या दिवशी कुंकू, अक्षता, दिवा, मिठाई ताटात ठेवल्या जातात. राखीच्या दिवशी भावाला टिळक लावून आणि त्याच्या मनगटावर राखी बांधली जाते. राखी बांधल्यानंतर भाऊ भेटवस्तू देतो. या विशेष दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात.