Horoscope 6 March 2023 : महादेवाच्या कृपेने 'या' 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार! जाणून सर्व राशींचे राशीभविष्य

Horoscope 6 March 2023 :  कसा असेल आजचा दिवस शुभ की अशुभ... जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य 

Updated: Mar 5, 2023, 11:39 PM IST
Horoscope 6 March 2023 : महादेवाच्या कृपेने 'या' 5 राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार! जाणून सर्व राशींचे राशीभविष्य title=

Daily Horoscope 6 March 2023 :  6 March 2023 हा दिवस 5 राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. सोमवार अर्थात महादेवाचे वार असल्याने या दिवशी या पाच राशींच्या लोकांवर विशेष कृपादृष्टी होणार आहे. जाणुन घ्या सर्वा 12 राशींचे राशी भविष्य (Horoscope 6 March 2023). 

मेष (Aries) 

मन प्रसन्न राहील. बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्यात अडथळे येतील. सावध रहा. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातून धन लाभ होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता.

वृषभ (Taurus)

मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल .कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायासाठी परदेशात जावे लागेल. प्रवास लाभदायक ठरेल. भावंडांची साथ मिळेल.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी तुमच्यात आत्मविश्वास भरलेला राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यावसायिक कामात यश मिळेल, पण मेहनतही जास्त असेल. लाभाच्या संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. स्वादिष्ट भोजनाची आवड निर्माण होईल.

कर्क (Cancer)

एखाद्या राजकारण्याला भेटण्याचा योग जुळून येईल. नोकरीत कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. कामाचा ताण वाढू शकतो.  वाद होऊ शकतो. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह (Leo)

मनात शांती आणि आनंद राहील. आत्मविश्वासही भरपूर असेल . कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. खर्च वाढतील. अनेक दिवसांपासून अडलेला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.

कन्या (Virgo)

मन अस्वस्थ राहील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंब तुमच्यासोबत असेल. धार्मिक स्थळाच्या यात्रेला जाऊ शकता. नोकरीच्या व्यापात वाढ होऊ शकते. भावांपासून दुरावण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या

तूळ (Libra)

मनात चढ-उतार असतील. मध्येच अस्वस्थ देखील वाटेल. व्यवसायात यश मिळेल. व्यवसायाच्या विस्तारासाठी वडिलांकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळू शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio)

मनातून एक वेगळाच आत्मविश्वास वाटेल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. एखाद्या मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव मिळू शकतो. व्यवसायातून लाभाच्या संधीही मिळू शकतात. प्रवासाचे सुखद परिणाम मिळतील.

धनु (Sagittarius)

आत्मविश्वासाने परिपूर्ण असला तरी मन अस्वस्थ राहू शकते. व्यवसायाची स्थिती समाधानकारक असेल. परंतु मेहनत जास्त असेल. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

मकर (Capricorn)

सयंम बाळगा. अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाऊ शकता. मित्रांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. याचा निश्चित लाभ मिळेल.

कुंभ (Aquarius)

आत्मविश्वास भरलेला असेल, पण मनात चढ-उतार असतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. संतती सुखात वाढ होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक काळजी त्रासदायक ठरू शकते.

मीन (Pisces)

शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यासाठी प्रवासालाही जाऊ शकता. खर्च जास्त होईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीच्या मिळू शकतात.