Horoscope 21 June 2022 : 'या' राशीला मिळणार नशिबाची साथ, सर्व चिंता होणार दूर

जोडीदाराची मदत मिळणार आहे

Updated: Jun 21, 2022, 07:24 AM IST
Horoscope 21 June 2022 : 'या' राशीला मिळणार नशिबाची साथ, सर्व चिंता होणार दूर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मेष- उगाची चिंता करु नका. कोणत्याही वादात अडकू नका. जोडीदाराची मदत मिळणार आहे. मारुतीरायाला लाल फूल अर्पण करा. 

वृषभ- धनलाभ होण्याचा योग आहे. कुटुंबात सर्वजण व्यग्र असतील. निर्धनाला दान करा. 

मिथुन- मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य सुधारेल. धनलाभ होणार आहे. हनुमान चालिसा वाचा. 

कर्क- आज तुमच्या राशीला फायदा मिळणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. करिअरमध्ये फायदा होऊन बऱ्याच गोष्टी मनाजोग्या होणार आहेत. 

सिंह - आरोग्याची काळजी घ्या, नोकरीच्या ठिकाणी कोणतेही वाद करु नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. 

कन्या- करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबाला वेळ द्या. एखाद्या निर्धन व्यक्तीची मदत करा. 

तुळ- मानसिक ताणतणावांपासून आता तुमचा दूर होण्यासाठीचा प्रवास सुरु होणार आहे. संपत्तीची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 

वृश्चिक- आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज कोणताही वाद घालू नका. दिवस सपभ आहे. 

धनु- आरोग्याची काळजी घ्या. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. मित्रांची मोलाची मदत तुम्हाला मिळणार आहे. 

मकर- वैवाहिक आयुष्यातील सर्व तणाव दूर होणार आहेत. एखादा प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. करिअरच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 

कुंभ- मानसिक ताणतणाव दूर होऊन आरोग्य सुधारेल. शत्रूही मित्र होणार आहेत. तुमची वाणी चांगलीच ठेवा. 

मीन- अडकलेली सर्व कामं मार्गी लागणार आहेत. धनलाभाचा योग आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.