close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | गुरुवार | १ ऑग्स्ट २०१९

जाणून घ्या आजच्या दिवसाविषयी 

Updated: Aug 1, 2019, 08:33 AM IST
आजचे राशीभविष्य | गुरुवार | १ ऑग्स्ट २०१९

मेष- काही कामांमध्ये अडचणी येऊ शकतात. मेहनत करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याची काळजी घ्या. एखादं नवं वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. 

वृषभ- व्यवसायामध्ये फायदा होण्याची संधी आहे. नोकरदार वर्गाला आज फायदा होणार आहे. सोबत काम करणाऱ्यांचीही मदत मिळेल. साथीदाराचं सहकार्य लाभेल. अविवाहितांची लव्हलाईफ चांगली असेल. काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल येतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. 

मिथुन- आज बऱ्याच अंशी सक्रिय असाल. नोकरीच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. धनलाभ होण्याचे योग आहेत. आरोग्य सुधारेल. 

कर्क- नोकरीच्या ठिकाणी काहींजणांवर प्रभाव पाडण्यात तुम्हाला यश येईल. नोकरी बदलण्याचा किंवा जास्तीचं काम करण्याचा विचार कराल. यामध्ये तुम्हाला नशीबाची साथ असेल. व्यवसायामध्ये काही नव्या संधी हाती येतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. काळजी घ्या. 

सिंह- वरिष्ठांकडून फार सहकार्याची अपेक्षा करु नका. व्यापारात सावधगिरी बाळगा. नोकरी आणि व्यवसासायामध्ये जी कामं हाती घ्याल, त्यात यश मिळण्याची शक्यता कमी आहे. कोणत्याही बाबतीत घाई करु नका. पैसे साठवा, वायफळ खर्च टाळा. एखाद्या ठिकाणी फिरायला जाण्याचे बेत आखाल. 

कन्या- नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतील काही महतत्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. साथीदाराकडून एखादी भेटवस्तू मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्य सुधारेल. 

तुळ- काही अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. नोकरी आणि व्यवसायामध्ये वेळीच अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे निराश व्हाल. आज तुम्लाला विवाहप्रस्ताव मिळू शकतात. 

वृश्चिक- व्यवसायामध्ये फायदे होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गासाठी ही वेळ चांगली आहे. शत्रूवर विजय मिळवू शकाल. साथीदाराची तुम्हाला मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

धनु- नोकरगार वर्गाच्या वाटेत काही अडचणी येतील. व्यापार करणाऱ्यांनी काळजी घ्या. कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्याचा योग आहे. अविवाहितांसाठी हा काळ चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर- जुन्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. रोगांपासून आराम मिळेल. 

कुंभ- करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळेल. काही चांगले आणि मोठे बदल होण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन- अचानक फायदा होऊ शकतो. जुनं कर्ज फेडाल. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवता येईल. कोणतीही गोष्ट सावधगिरीनेच बोला. आजारपणापासून सावध राहा.