आजचे राशीभविष्य | १० डिसेंबर २०१९ | मंगळवार

आजचा दिवस कसा असेल? 

Updated: Dec 10, 2019, 08:20 AM IST
आजचे राशीभविष्य | १० डिसेंबर २०१९ | मंगळवार

मेष - हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय व्यस्त ठेवणारा असणार आहे. पण आजचा दिवस तुम्हाला थोडी उसंत देणारा आहे. आजच्या दिवसभरात मनाला शांती मिळेल. तुम्ही स्वतःला आज थोडा आराम द्याल. ही एक चांगली गोष्ट आहे. आज मित्रपरिवाराला वेळ द्याल. 

वृषभ - आजचा तुमचा दिवस अतिशय व्यस्त ठेवणारा असणार आहे. करण्यासाठी आज अनेक गोष्टी आहे. या गोष्टी तुम्ही थांबवू शकत नाही. कामांची यादी करून एक एक काम संपवाल. 

मिथुन - आज तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला खूप मिस कराल. मिथुन राशीकरता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भूतकाळाला विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमचं आयुष्य अधिक सुंदर करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या जीवनात पुन्हा स्थान द्या. 

कर्क - आजचा दिवस कार्यक्रमात सहभागी होणारा असणार आहे. आजचा दिवस भविष्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचा असणार आहे. तुमच्याद्वारे बनवलेले कनेक्शन आज कामात येतील. सामाजिक गोष्टींपासून आज थोडं लांब रहा. 

सिंह - तुम्ही जो विचार करताय त्यासाठी तुम्ही ठाम राहा. तेव्हाच लोकं तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येतील. आदेश न करता मदतीकरता हात पुढे करा. तुमची मत लोकांच्या समोर मांडा. नक्की गोष्टी सुरळीत होतील. 

कन्या - तुमचं नियंत्रण कौशल्य आज पणाला लागेल. मदतीची गरज असल्यामुळे लोकं तुमच्याकडे येतात. लोकांना तुमचा सल्ला महत्वाचा वाटतो त्यामुळे विचारपूर्वक मार्गदर्शन करा. 

तूळ - आज तुम्ही खूप रचनात्मक गोष्ट करा. जर तुम्ही कलेच्या क्षेत्रात काम करत असाल तर आजचा दिवस प्रेरणादायी ठरेल. विचारांमध्ये आज स्पष्टता आणाल. 

वृश्चिक - आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. एक महत्वाचा बदल तुम्ही तुमच्यात कराला हवा. स्वतःवर नियंत्रण ठेवा. मानसिकता बघून लोकांशी महत्वाच्या गोष्टी शेअर करा. 

धनू - तुमचा आजचा सल्ला लोकांसाठी महत्वाचा ठरेल. त्यांच्या निर्णय प्रक्रियेत तुमची खूप मोठी मदत होईल. नेतृत्व कौशल्य आज पणाला लागेल. सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा विचार कराल. 

मकर - आज खूप वेगळी भावना तुमच्या मनात असेल. कारण जवळपास अनेक गोष्टी असून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. पण सगळ्यागोष्टी मनापासून करण्याचा विचार करा. 

कुंभ - आज सकाळपासून सकारात्मक असल्याची भावना असेल. स्वतःमध्ये आज खूप बदल जाणवतील. आज अनेक काम अतिशय शांतपद्धतीने पूर्ण कराल. 

मीन - आज एक नवीन खेळ सुरू करण्यासाठी आणि ती गोष्ट स्वीकारण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा असेल. आज थोडं मोकळं वातावरणात फिरा. तुमच्या तब्बेतीच्या दृष्टीकोनातून चांगल असेल.