close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशिभविष्य | रविवार | 19 मे 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: May 19, 2019, 09:50 AM IST
आजचे राशिभविष्य | रविवार | 19 मे 2019

मेष : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. वरिष्ठांची मदत मिळेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराची मदत घेणे फायदेशीर ठरेल. नोकरीची चांगली संधी मिळू शकते. मित्रांच्या भेटीगाठी होतील. 

वृषभ : व्यवसायासाठी चांगला दिवस आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करा. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. योजनापूर्वक आणि विचार करून निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. दिनक्रमात बदल करण्याची गरज. चांगली कल्पना मांडल्याने लोक प्रभावित होतील. धनलाभ होण्याची शक्यता. 

मिथुन : भागीदारीने व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. आज एखादा नवीन प्रयोग कराल, आत्मविश्वास वाढेल. कोणताही निर्णय घेताना मनाचे ऐका. रोमँटिक क्षण अनुभवायला मिळण्याची शक्यता. 

कर्क : आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. काही घरगुती समस्या उद्भवण्याची शक्यता. वेळ एकांतात घालवा. नोकरी अथवा उद्योगात आज केलेली एखादी तडजोड भविष्यात फायदेशीर ठरु शकते. 

सिंह : एखादे काम करण्यासाठी नव्या पद्धती आजमवून पाहाल. संपूर्ण दिवस कामात गेला तरी चांगला असेल. नोकरी अथवा उद्योगात बढती आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता. 

कन्या : करिअरशी संबंधित समस्या सुटू शकते. नोकरीत कामाची प्रशंसा होईल, बढती मिळण्याची शक्यता. व्यवसायात बऱ्याच काळापासून थकलेली येणी वसूल होतील. 

तूळ : तब्येतीची काळजी घ्या. कामातही सावधानता बाळगा. जोडीदार तुमच्यावर रागवण्याची शक्यता, मात्र संयम बाळगा. नोकरी आणि व्यवसायात तुर्तास निर्णय घेणे टाळा. 

वृश्चिक : थकलेली येणी वसूल होती. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल, बढतीचा योग संभवतो. प्रेमकरणातही यश संभवते, जोडीदाराची मदत कराल. 

धनु : कनिष्ठांकडून मिळालेली मदत फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन संधी समोर येतील, नवी सुरुवात करता येईल. भुतकाळात तुम्ही मदत केलेली व्यक्ती अचानक मदतीसाठी धावून येईल. प्रेमकरणात जोडीदाराचे मन रिझवण्यासाठी प्रयत्न कराल. 

मकर : व्यवसायानिमित्त प्रवासयोग संभवतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्यही चांगले राहील. 

कुंभ : नोकरी आणि व्यवसायात आज तुमच्या हातून चांगली कामगिरी घडेल. प्रवासयोग संभवतो. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. तब्येतीची काळजी घ्या. 

मीन : कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करावा लागेल. नोकरी किंवा व्यवसायात मन रमणार नाही. मनातील गोंधळ वाढेल. प्रियकर किंवा प्रेयसीशी वाद होऊ शकतो. दुसऱ्यांकडून तुमचे श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न होईल. मात्र, ठामपणे स्वत:ची बाजू मांडा.