आजचे राशीभविष्य | सोमवार | २९ जुलै २०१९

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस.... 

Updated: Jul 29, 2019, 09:17 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | २९ जुलै २०१९  title=

मेष- आज तुम्हाला स्वत:चं महत्त्वं कळेल. दैनंदिन कामं सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस जबाबदारीचा आहे. एकामागोमाग एक अशी कामं सुरुच असतील. कोणा एका व्यक्तीशी नवं नातं जुळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी फायदा होण्याची शक्यता आहे. 

वृषभ- भावनांचा कोलाहल असेल. आज जीवनात एखादा बदल होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करु नका. सोबत काम करणाऱ्यांची मदत मिळेल. एखादी शुभवार्ता मिळेल ज्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. 

मिथुन- पैशांच्या बाबतीत तुमचं कोणतंही काम अडणार नाही. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. इतरांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. व्यवसायाच्या बळावर यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबीक प्रकरणं निकाली काढाल. अडकलेली कामं पूर्णत्वास न्याल. 

कर्क- अचानक मोठा फायदा आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची जास्तीत जास्त अपूर्ण कामं पूर्णत्वास जाऊ शकतात. आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दूरवर दिसतील. कौटुंबीक प्रकरणांर तोडगा निघेल. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग आहे. 

सिंह- कोणा एका व्यक्तीसोबतच्या नात्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास ठेवा. कोणत्याही प्रकारचा हट्ट करु नका. सवयी सुधारण्याच प्रयत्न करा. आजचा दिवस सर्वसामान्य असेल. काही काळापूर्वी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होऊ शकेल. 

कन्या- वाहन खरेदीची इच्छा होईल. आज तुम्ही जास्त भावनात्मक विचार कराल. व्यवसाय आणि कामाच्या निमित्ताने प्रवास करण्याचा योग आहे. जुन्या मेहनतीचा फायदा होऊ शकतो. साथीदाराचं सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

तुळ- एखाद्या कामात पुढाकार घ्या, फायद्याचं ठरेल. कामाचा व्याप जास्त असेल. आज जास्त मेहनत करावी लागेल. एखादी नवी गोष्ट शिकण्याची संधी मिळेल. शुभकार्यांमध्ये सहभागी व्हाल. नव्या लोकांना भेटण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक- कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. एखादी शुभवार्ता मिळेल. व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे. 

धनु- एखाद्या खास कामात मदत मिळू शकते. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल. पुढे जाण्याची संधी मिळेल. इतरांचं लक्ष वेधण्यात यशस्वी ठराल. 

मकर- हाताशी जास्त वेळ ठेवा. आज तुम्ही कामकाजात जास्त व्यग्र असाल. तुमचं म्हणणं स्पष्टपणे सर्वांसमोर ठेवा. परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. 

कुंभ- कामाच्या पद्धतीमुळे आदर मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराचं सहकार्य मिळेल. खर्च आणि गुंतवणूकीचा विचार स्वत:च करा. दैनंदिन कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मीन- आज तुम्ही एखादं काम हमखासपणे पूर्ण कराल. न्यायालयीन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जुनं कर्ज फेडण्याची इच्छा होईल. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील.