मेष- तुमच्या समस्यांचं निवारण तुम्हीच करणार आहात. फक्त यामध्ये कोणा एका खास व्यक्तीचा सल्ला तुम्हाला दिशा दाखवणार आहे. अशा व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न तुम्हालाच करायचा आहे.
वृषभ- आज इतरांचं म्हणणं लक्षपूर्वकपणे ऐका. विचार चांगले आणि सकारात्मक ठेवा. इतरांकडून खूप काही शिकण्याची संधी तुमच्यासमोर आहे.
मिथुन- तुमचं मत मांडत असताना इतरांचा अपमान होत नाही ना, याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीवर तुमचं नियंत्रण नाही. पण, तरीही त्या गोष्टींचा अट्टहास नको.
कर्क- कायम तुमचं म्हणणं योग्य असेल असं गरजेचं नाही. त्यामुळे यावेळी मतप्रदर्शन करताना परिस्थितीचा चौफेर विचार करा. यश तुमच्या प्रतिक्षेत आहे.
सिंह- तुम्ही मितभाषी असाल तरीही यावेळी मात्र खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. तुमचं मत कोणासाठी तरी महत्त्वाचं असेल. तुमचे विचार परखडपणे मांडा.
कन्या- राजकारणापासून दूर राहा. तुम्ही वादात अडकू शकता. स्वत:च्या कामावर लक्ष द्या. इतरांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
तुळ- गैरसमज दूर करण्याला प्राधान्य द्या. प्रत्येकाशी सहमत होण्याची गरज नसली तरीही, अतिघाई फायद्याची नाही.
वृश्चिक- कोणत्याही गोष्टीसाठी सतत इतरांवर दोष लावणं बंद करा. कारणं शोधा, त्यावर तोडगा काढा. परिस्थिती तुम्हाला मार्ग दाखवेल.
धनु- आज इतरांकडून तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते. राग करु नका. संयम ठेवा. इतरांच्या मदतीसाठी तयार राहा.
मकर- एखादा खूप जवळचा मित्र अडचणीत आहे, त्याची मदत करा. काही चुका झाल्यास त्याला माफ करा.
कुंभ- प्रियजनांसमवेत मतभेद होऊ शकतात. पण, एकमेकांच्या मतांचा आदर करा. सर्वकाही सुरळीत होईल.
मीन- काही गोष्टींच्या बाबतीत दुरून डोंगर साजरे हीच भूमिका ठेवा. कोणाएका व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात. पण, माघार घेणं कधीही उत्तम.