आजचे राशीभविष्य | सोमवार | ०९ सप्टेंबर २०१९

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.

Updated: Sep 9, 2019, 09:07 AM IST
आजचे राशीभविष्य | सोमवार | ०९ सप्टेंबर २०१९ title=

मेष- कामाचा व्याप वाढल्यामुळे दिवसभर बिझी असाल. व्यवसायातील काही समस्या सामंजस्याने सुटतील. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. प्रवासाचा योग संभवतो. 

वृषभ- जुन्या समस्या सुटतील. स्वत:कडे अधिक लक्ष द्याल. नवे कपडे खरेदी कराल. उत्त्पन्न आणि खर्चाचा समतोल सांभाळा. संयम बाळगा, यश नक्की मिळेल. मित्रांची मदत होईल.

मिथुन- धनलाभ होण्याचा योग संभवतो. नव्या योजना आणि कल्पना सुचतील. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात स्वत:ला सिद्ध कराल. एखादी शुभवार्ता कानावर पडेल.

कर्क- अचानक धनलभा संभवतो. जुनी येणी वसूल होतील. आर्थिक गोष्टींमध्ये मित्रांची मदत मिळेल. व्यवहारीपणे आणि संयमाने निर्णय घेतल्यास बहुतेक समस्या सुटू शकतात.

सिंह- आर्थिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता. महत्त्वाकांक्षा वाढेल, आनंदी राहाल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील.

कन्या- नोकरी आणि व्यवसायात नव्या गोष्टींची चाहुल लागेल. नवे प्रयोग यशस्वी ठरू शकतात. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. जोडीदारासोबत वेळ घालवायची संधी मिळेल. 

तूळ- डोक्यात घोळत असलेल्या योजना अंमलात आणा. सार्वजनिक कामांमध्ये मन रमेल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखाल, धनलाभही संभवतो. 

वृश्चिक- आजचा दिवस विशेष ठरेल. काही गोष्टींचा उलगडा होईल, फायदा मिळण्याची शक्यता. एखादी अवघड समस्या सोडवण्यासाठी चांगला दिवस. नशीबाची साथ मिळेल, जुनी येणी वसूल होतील. 

धनु- नोकरी, करियर आणि पैशांच्यादृष्टीने अत्यंत चांगला दिवस. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळू शकते. नव्या लोकांच्या संपर्कात याल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे मन वळविण्याच यशस्वी ठराल. 

मकर- एखाद्या महत्त्वाच्या कामाला हात घालाल. मेहनत करून समाधान मिळेल. अविवाहित लोकांसाठी चांगला दिवस. इतरांना ओव्हरेटक करण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ- खंबीरपणे आणि धैर्याने निर्णय घ्याल. जमीनजुमल्याच्या व्यवहारात यश मिळेल. कामाचा व्याप वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी काही नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. आरोग्याची चिंता दूर होईल.

मीन- आज प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता. मनात सतत पैशाचे विचार घोळत राहतील. मात्र, तातडीने निर्णय घेणे आवश्यक. बाहेर फिरण्यासाठी चांगला दिवस.