आजचे राशीभविष्य | शनिवार | 16 फेब्रुवारी 2019

असा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 17, 2019, 07:51 AM IST
आजचे राशीभविष्य | शनिवार | 16 फेब्रुवारी 2019 title=

मेष : तुमचे व्यक्तित्व आकर्षित राहील. मन देखील मजबूत राहील. घर, जमीनी संदर्भात काही नव्या संधी मिळतील. ऑफिसमध्ये काही अर्धवट कामे उरकण्याकडे तुमचा कल असेल. जे काही बदल होत आहेत ते तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहेत. परिवार आणि समाजातील लोक तुमच्या मदतीला येतील. 

वृषभ : आज थोडा संयम आणि सातत्या दाखवाल तर तुम्हाला यश मिळू शकेल. ठरवलेली काम सहज पूर्ण होण्याचे योग आहेत. आज तुम्ही येणाऱ्या दिवसांचे प्लानिंग कराल. कोणत्या खास व्यक्तीशी तुम्ही आपल्या मनातील गोष्ट शेअर कराल. काही मोठे निर्णय देखील घेऊ शकाल. व्यवसाय वाढण्याचे योग आहेत. 
 
मिथून : द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्यात तुम्हाला यश मिळेल. अनेक समस्या सुटू शकतात. पैसे मिळण्याचे योग आहेत. कोणत्या तरी एका व्यक्तीशी तुमचे संबंध सुधारण्याचा योग आहे. कोणती तरी चांगली बातमी मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुष होतील. नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क : त्रासातून मुक्तता मिळेल. कोणत्या तरी नव्या टेक्निकमुळे तुमचे काम सोप्पे होईल. कोणते तरी नवे उपकरण तुम्ही खरेदी करु शकाल. कोणत्या तरी नव्या विचारावर काम करु शकाल. टेक्निक तुमच्यासाठी मदत करणारी आणि फायदेशीर ठरु शकते. व्यवसायात परिवाराची मदत मिळेल. व्यवसायाची सुरूवात होऊ शकेल. प्रेमात यश मिळेल. 
 
सिंह : तुमच्या मनात काही मोठे विचार येतील. विश्वासातील लोकांचा सल्ला घ्या. तुम्ही तुमचे कौशल्य दाखवण्यात यशस्वी व्हाल. वाचण्यात आणि काही नवे शिकण्यात आवड निर्माण होईल. व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त प्रवास होऊ शकतो. संयम ठेवा. ठरवलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 
 
कन्या : करियरमध्ये बदल करण्यासाठी वेळ चांगला आहे. स्पष्ट, मुद्देसुद आणि थेट बोलण्याने तुमच्या अडचणी कमी होतील. मित्र आणि नातेवाईकांची मदत देखील तुम्हाला होऊ शकेल. धन लाभ होण्याचे योग आहेत. केलेल्या कामांचा फायदा मिळेल. कामामध्ये यश मिळेल. विवाह योग्य लोकांना प्रस्ताव येतील. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी सल्ला नक्की घ्या. 
 
 तुळ : अविवाहीत लोकांची प्रेम आयुष्य चांगले असेल. लग्न झालेल्यांना देखील जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. फिरण्यात आणि मनोरंजनात दिवस जाईल. आज कोणती तरी चांगली बातमी कानावर येईल. व्यवसायात व्यस्त व्हाल. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. काही तरी नवे शिकण्यास मिळेल. 
 
वृश्चिक : मेहनत कमी करेल आणि फायदा जास्त मिळेल. कोणासोबत तरी विशेष बोलणी होतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. सोबत काम करणाऱ्या व्यक्तींचा सल्ला करियरमध्ये उपयोगी येईल. आज तुम्ही आनंदीत राहाल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीने तुम्ही समोरच्यांना तुमच्या बाजूने करु शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने वातावरण असेल. 
 
धनू : तुमच्या मनातील गोष्ट कोणाला सांगायची असल्यास सांगून टाका. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्याल. आपल्या मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही कोणते तरी रहस्य जाणून घ्याल. व्यवसायात नवा करार करावा लागू शकतो. वैवाहीक आयुष्यात तुम्हाला आनंद मिळण्याचे योग आहेत. जोडीदाराकडून सन्मान मिळेल. 
 
मकर : तुमची मोठी अडचण दूर होईल. कमावण्याचे मार्ग खुले होतील. आज काम जास्त असू शकते. बॉसशी बोलण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रोजची कामे पूर्ण होतील आणि आरोग्य देखील चांगले राहील. 
 
कुंभ : नोकरदारवर्ग आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामासाठी संतुष्ट असतील. वरिष्ठांशी होणाऱ्या बोलण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. विरोधकांवर विजय मिळवाल. मुलांकडून सुख मिळेल. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतूक करतील. पती-पत्नीमध्ये सामंजस्य राहील. आई-वडीलांचे आशीर्वाद घ्या. 

मीन : धन लाभ होण्याची संधी आहे. पैशांच्या प्रकरणांमध्ये सुधार होण्याचे योग आहेत.  काही संधींचा तुम्हाला फायदा होईल. अचानक धन लाभ होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घेऊनच निर्णय करा. जवळच्या लोकांचे कौतूक करा. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुठूनतरी चांगली बातमी मिळेल. कामधंदा चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील.