Today`s Panchang : आज 11 नोव्हेंबर 2022, शुक्रवार. आज कार्तिक कृष्ण तृतीया. आजचं चंद्रनक्षत्र मृग, तर चंद्ररास वृषभ/ मिथून. आज सूर्योदय सकाळी 6 वाजून 40 मिनिटं आणि सूर्यास्त सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटं. चंद्रोदयाची वेळ रात्री 8.10 मिनिटं आणि चंद्रास्ताची वेळ सकाळी 9 वाजून 4 मिनिटं.
आजचा दिवस सुहासिनी महिलांसाठीही महत्त्वाचा आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संतानसुखासाठी आजच्या दिवशी सुहासिनी महिला उपवास करतात. यावेळी देवी पार्वतीच्या आशीर्वादानं महिलांना अखंड सौभग्यप्राप्ती होते असं म्हणतात.
आज शुक्रवार. देवी लक्ष्मीचा वार. आजच्या दिवशी (Laxmi pujan) लक्ष्मीच्या चरणी कमळ, लाल गुलाब ही फुलं अर्पित करावीत. पूजेसाठी शंख, रमळ, बत्तासे असा प्रसाद करावा. आजच्या दिवशी देवीला खिरीचा नैवेद्य दाखवणंही लाभदायी असेल. या दिवशी देवीची आराधना केल्यानं आर्थिक समस्या दूर होतील.
(Friday) शुक्रवारच्या दिवशी उपवास केल्यानं शुक्र ग्रह बीज मंत्र जाप केल्यानं ग्रहदोष दूर होतात. शुक्राला प्रसन्न करण्यासाठी आज सफेद वस्त्र, सुगंधित पदार्थ, मोती, चांदी दान करावी.
(Todays Mahurat )आजचा शुभमुहूर्त सकाळी 11 वाजून 43 मिनिटं आणि 17 सेकंदांपासून दुपारी 12 वाजून 26 मिनिटं आणि 36 सेकंदांपर्यंत असेल. अशुभ मुहूर्त सकाळी 8 वाजून 50 मिनितं आणि 05 सेकंदांपारून 9 वाजून 33 मिनिटं आणि 23 सेकंदांपर्यंत असेल.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातजमा करत नाही.)