मुंबई : प्रत्येक व्यक्तीचा कोणत्या ना कोणत्या राशीशी संबंध असतो. शनी उद्या मीन राशीत प्रवेश करत आहे. शनीच्या संक्रमणाचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येतो. हा बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असेल.
जाणून घेऊ शनीच्या संक्रमणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊ.
मेष : शनीचे संक्रमण उत्पन्न वाढवेल. पगार वाढू शकतो. व्यापाऱ्यांना फायदा होईल. नवी नोकरी मिळू शकते. सरकारी नोकरदारांसाठी चांगला काळ आहे.
वृषभ : शनीचा कुंभ राशीत प्रवेश शुभ राहील. ज्याची स्वप्ने तुम्ही खूप दिवसांपासून पाहिली ती आवडती नोकरी मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागतील. परदेश प्रवासाची शक्यता आहे.
मिथुन : शनीचे संक्रमण उत्पन्न वाढवेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. तुम्ही धीर धरल्यास अनेक फायदे मिळू शकतात. सासरच्यांशी संबंध सुधारतील.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना हा काळ अडचणी देऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. ही वेळ संयमाने घ्या.
सिंह : या राशीच्या लोकांनी सुरक्षित राहावे. सावधगिरीने चालणे चांगले आहे. कारण, शत्रू, रोग नुकसान करू शकतात. कोणत्याही खटल्यात अडकू नका. शनीपासून बचावासाठी उपाय करा.
कन्या : या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचे दुसरे चरण सुरू होईल. जरी या चरणामुळे जास्त नुकसान होणार नाही. विशेषतः विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला जाईल.
तूळ : या राशीच्या लोकांसाठी शनीच्या राशीतील बदलाचा चांगला परिणाम होईल. कुत्र्याला रोज भाकरी दिल्यास विशेष फायदा होईल. घरात एक गॉड बातमी येऊ शकते.
वृश्चिक : या राशीवर शनीच्या राशी बदलाचा प्रभाव राहील. चांगले कर्म केल्यास शनी शुभ फळ देईल. आईची सेवा करा. जमीन आणि घर खरेदीची शक्यता निर्माण होऊ शकते.
धनु : या राशीच्या लोकांनी हा काळ संयमाने घालवावा. अनेक प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पिठाच्या चार गोळ्यांवर हळद लावा आणि दर गुरुवारी गायीला खाऊ घाला.
मकर : शनी मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. कुंभ आणि मकर दोन्ही शनीची चिन्हे आहेत. मकर राशीच्या लोकांसाठी हा बदल शुभ आहे. ते प्रचंड पैसा कमवू शकतात.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी शुभ फल देईल. आरोग्य चांगले राहील. करिअरमध्ये प्रगती होईल. धनलाभ होईल.
मीन : मीन राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू होईल. या लोकांना स्वतःला वाचवले पाहिजे. पोलिस केसपासून दूर राहा. कोणताही आजार होऊ शकतो. शनीपासून बचाव करण्यासाठी उपाय करा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)