Tirgrahi Yog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका विशिष्ट वेळेनंतर नऊ ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रात भ्रमण करतात. त्यामुळे ग्रह राशीत त्रिग्रही योग आणि राजयोग तयार होत असतात. ज्याचा परिणाम सर्व राशींवर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम दिसून येतो. दिवाळीनंतर 17 नोव्हेंबरला त्रिग्रही योग तयार होतो आहे. या दिवशी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीत आधीपासून मंगळ आणि बुध विराजमान आहेत. त्यामुळे हा त्रिग्रही योग 3 राशींच्या आयुष्यात धनवर्षाव करणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशी आहेत नशिबवान... (Trigrahi yoga will be created in the sign of Mars in scorpio There will be wealth on these 3 zodiac signs)
त्रिग्रही योग सिंह राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांच्या कुंडलीच्या चौथ्या घरात हा योग निर्माण होतो आहे. त्यामुळे वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग निर्माण होणार आहेत. तुमच्या सर्व मनोकामना पू्र्ण होतील. रिअल इस्टेट, मालमत्ता संबंधित व्यवसायात तुम्हाला उत्तम फायदा होणार आहे. तुमच्या आईशी तुमचं संबंध अधिक मजबूत होणार आहे. त्रिग्रही योगाची दृष्टी कर्माच्या घरात पडणार आहे. त्यामुळे या लोकांना आर्थिक आणि करिअरमध्ये उंच शिखर गाठणार आहात.
त्रिग्रही योग तुमच्यासाठी वरदान आहे. कारण तुमच्या कुंडलीतील धन घरात हा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अनपेक्षित पैसे लाभणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होणार आहे. तुम्हाला भरपूर पैसा मिळणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडणार आहेत. तुमचं पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळणार आहेत. तुमच्या वाणीमुळे तुम्ही सहज कामं करुन घेणार आहात. करिअर मार्केटिंग, मीडिया, शिक्षक किंवा कम्युनिकेशनशी संबंधित लोकांनासाठी हा योग अतिशय शुभ ठरणार आहे.
त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. तुमच्या पारगमन कुंडलीत उत्पन्न आणि लाभाचे योग निर्माण होत आहेत. त्यामुळे तुमचं बँक बॅलेन्स प्रंचड वाढणार आहे. तुमचं उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे आहे. तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला शेअर बाजार, लॉटरीमध्ये पैसे गुंतवणे फायदेशीर ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)