Vaishakh Purnima 2023 : आज वैशाख पौर्णिमेला 130 वर्षानंतर विशेष योग, Chandra Grahan असल्याने स्नान आणि दान करायचं का?

Vaishakh Purnima 2023 : वैशाख महिन्याची पौर्णिमा आज आहे. यासोबतच आज वर्षातील पहिलं चंद्रग्रहणदेखील (Chandra Grahan) आहे. पौर्णिमेला स्नान आणि दान या महत्त्व आहे. चंद्रग्रहण असल्याने स्नान आणि दान करण्याबद्दल संभ्रम आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 5, 2023, 08:52 AM IST
Vaishakh Purnima 2023 : आज वैशाख पौर्णिमेला 130 वर्षानंतर विशेष योग, Chandra Grahan असल्याने स्नान आणि दान करायचं का? title=
vaishakh purnima 2023 puja time vidhi upay after 130 years yog buddha purnima and chandra grahan

Vaishakh Purnima 2023 : हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असं म्हटलं जातं. आज पौर्णिमेसोबत चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि भगवान बुद्धांची जयंतीदेखील  (Buddha Jayanti 2023) आहे. तब्बल 130 वर्षांनी वैशाख पौर्णिमेला चंद्रग्रहण हा योगायोग जुळून आला आहे. पौर्णिमा म्हटलं की स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व असतं. पण चंद्रग्रहण आल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रश्न पडला आहे की, आज स्नान आणि दान करायचं की नाही. त्याशिवाय जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ, पूजा पद्धत, मंत्र आणि या दिवशी चंद्राच्या पूजेचे महत्त्व...(vaishakh purnima 2023 puja time vidhi upay after 130 years yog buddha purnima and chandra grahan)

वैशाख पौर्णिमा 2023 मुहूर्त

सत्यनारायण पूजा मुहूर्त - सकाळी 07:18 पासून सकाळी 08:58 वाजेपर्यंत
चंद्रोदयाला अर्घ्य देण्याची वेळ - संध्याकाळी 06.45 वाजता
लक्ष्मी पूजन मुहूर्त - 05 मे 2023 ला रात्री 11:56 आणि 06 मे 2023 ला दुपारी 12:39 वाजता
कूर्म जयंती पूजा मुहूर्त - संध्याकाळी 04.18 रात्री 00.59 पर्यंत 

स्नान-दान करायचं की नाही?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान-दान, पूजा इत्यादीच्या शुभ मुहूर्तावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे सूर्योदयापासून स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त सुरु झाला आहे. 

शुभ योगायोग 

आज सकाळपासून रात्री 09:17 पर्यंत सिद्धी योग आहे. त्यानंतर व्यतिपात योग सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सिद्धी योग शुभ कार्यासाठी चांगला मानला जातो. तर आज स्वाती आणि विशाखा नक्षत्र असल्याने हा देखील शुभ योगा योग आहे. 

वैशाख पौर्णिमा पूजा विधी

पवित्र नदीत स्नान करा. 
घरी श्री हरी विष्णूची पूजा आणि सत्यनारायण करा. 
पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करुन 7 वेळा प्रदक्षिणा मारा. 
आजच्या दिवशी रात्री चांदीच्या भांड्यात दूध, पाणी आणि तांदूळ हे मिश्रण चंद्राला अर्घ्य अर्पण करा. 
मध्यरात्री देवी महालक्ष्मीला हळद, अत्तर, गुलाबाची फुलं अर्पण करा. 
लक्ष्मीदेवीच्या मंत्रांचा जप करा. 

 

हेसुद्धा वाचा - Panchang Today : आज वैशाख पौर्णिमा, चंद्रग्रहण आणि बौद्ध जयंती! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

 

वैशाख पौर्णिमा मंत्र 

ऊँ सों सोमाय नम: या मंत्राचा 108 वेळा जप करा. 

पौर्णिमेला चंद्राची पूजा करण्याचा फायदा

पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या किरणांमधून अमृतवृष्टी होते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यास ते पितरांपर्यंत पोहोचतं, असं म्हटलं जातं. चंद्राची उपासना केल्यामुळे मनावर नियंत्रण मिळतं आणि शक्ती प्राप्त होते. 

 

हेसुद्धा वाचा -  Horoscope Today : ग्रहांच्या अद्वितीय मिलनासह आजचं चंद्रग्रहण! 'या' लोकांचं भाग्य चंद्रसारखं चमकणार

 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)