सकाळी डोळे उघडताच 'या' गोष्टी कधीही पाहू नका, त्या दारिद्र्य घरी आणतात

खरंतर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पाहिला तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो.

Updated: May 5, 2022, 10:38 PM IST
सकाळी डोळे उघडताच 'या' गोष्टी कधीही पाहू नका, त्या दारिद्र्य घरी आणतात title=

मुंबई : लोकांचा दिवस वाईट गेला असेल, तर तुम्ही त्यांना हे बोलताना पाहिलं असेल की, आज कोणाचा चेहरा पाहिला म्हणून आजचा दिवस इतका वाईट गेला. त्यामुळेच असे म्हटले जाते की, सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन घ्यावं. ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. परंतु अनेक वेळा माणूस सकाळी उठल्याबरोबर आपल्या कामात व्यस्त होतो आणि देवाला नमस्कार करायला विसरतो. परंतु असे करु नये.

प्रत्येक कामात अपयश येणे, कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि केले जाणारे कामही बिघडू लागणे, असं सर्व तुमच्यासोबत देखील घडत असेल, तर तुम्ही सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहू नका

खरंतर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पाहिला तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो... चला तर मग जाणून घेऊयात की, अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सकाळी उठल्यावर आपण पाहू नये.

सकाळी डोळे उघडल्यावर या गोष्टी पाहू नका

आरसा

सकाळी डोळे उघडताच आरशाकडे पाहणे टाळावे, असे वास्तुतज्ज्ञांचे मत आहे. असे मानले जाते की, सकाळी व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने आरशात पाहिले, तर ते त्यांचा दिवस खराब करते. म्हणून, सकाळी उठून सर्वप्रथम चेहरा धुवा, मगच आरशात पहा.

गलिच्छ किंवा खराब पदार्थ पाहाणे

वास्तूनुसार रात्री किचनमध्ये घाण भांडी ठेवू नयेत. असे केल्याने घरात दारिद्र्य येते. दुसरीकडे, जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घाणेरडी भांडी साफ करण्यास सुरुवात केली, तर शरीरातील सकारात्मक उर्जेचा प्रवाह कमी होतो. त्याचबरोबर माँ लक्ष्मीलाही यामुळे राग येतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील भांडी आणि स्वयंपाकघर दोन्ही गोष्टी स्वच्छ करून झोपा.

बंद घड्याळ

घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घराच्या भिंतींवर बंद घड्याळ लावू नका. जर तुम्ही सकाळी उठल्यावर हे बंद घड्याळ पाहिले तर याचा अर्थ असा होतो की, तुमची वाईट वेळ सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळच्या बंद घड्याळाकडे पाहणे टाळावे.

आक्रमक प्राणी किंवा पक्षी

वास्तूनुसार घरामध्ये आक्रमक प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो लावणे वर्ज्य आहे. पण तरीही, जर कोणी ते लावले, तर त्याने सकाळी ही फोटो  पाहणे टाळावे. सकाळची अशी चित्रे पाहून दिवस कोणत्या ना कोणत्या वादातच जातो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)