शुक्रवारी मनोभावे ही पूजा करा, सर्व अडथळे झटपट दूर होतील

ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते.   

Updated: May 5, 2022, 09:02 PM IST
शुक्रवारी मनोभावे ही पूजा करा, सर्व अडथळे झटपट दूर होतील title=

मुंबई : हिंदू पंचागानुसार शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. म्हणजेच धन-धान्य देवीची पूजा. यामुळे महालक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यासाठी या दिवसाच्या पुजेचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच घरातील दारिद्र्य दूर होते.

ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते. 

लक्ष्मीची पूजा करताना प्रथम चार कापूर आणि दोन लवंगा घ्या. चारही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी, असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात. लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे.

लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. यामुळे धनसंचय होतो. पैशांच्या अडचणींवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो.

लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे. त्यामुळे लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते.

जेथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात नेहमी स्वच्छता ठेवा यामुळे लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील.

संध्याकाळच्या वेळेस कधीही झाडू मारु नका. यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते.

दर शुक्रवारी गोमातेला पोळी खायला द्या. यामुळे महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.

या दिवशी गरीब अथवा गरजू व्यक्तीला तांदूळ, सफेद रंगाचे कपडे अशा वस्तू दान करा. यामुळे मातेचा वरदहस्त तुमच्यावर राहील.

घरात चांगले वातावरण कसे राहील याकडे नेहमी लक्ष द्या. घरात तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.

शुक्रवारी देवीला लाल वस्त्र अर्पित करावे. महालक्ष्मी मंदिरात जाऊन लाल वस्त्र, लाल बांगड्या, लाल कुंकु, आणि मेंदी अर्पित करावी.

पाच लाल रंगाचे फुले घ्यावी. हि फुले हातात ठेवून देवी लक्ष्मीचे ध्यान करावे. घरात धन-धान्याच्या रुपात नेहमी विराजित राहावी अशी प्रार्थना करून हि फुले तिजोरीत किंवा पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावी. 

एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यात सव्वा किलो तांदूळ ठेवावे. तांदूळ अखंड असावे. त्याची पोटली तयार करून ओम श्रीं श्रीये नम: हा मंत्र पाच माळ जप करावा. नंतर ही पोटली तिजोरीत ठेवावी. याने अपार धन संपत्ती प्राप्त होते.