मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात. ज्याबद्दल कधीधी आपण फारसं लक्ष देत नाही. परंतु तुम्हाला माहितीय का? की ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट घडण्या मागे त्याचा काही ना काही अर्थ असतो आणि तुम्हाला जर त्याचे संकेत आधीच मिळाले तर त्याच्यापासून लांब राहण्यात मदत मिळेल. ज्योतिष शास्त्रात अशी अनेक चिन्ह सांगितली आहेत, जी जीवनातील चढ-उतारांबद्दल आपल्याला सावध करतात. आज आपण अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे संकट येण्याआधीच आपल्याला अलर्ट करतील.
धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला विशेष महत्त्व आहे. घरातील तुळशीचे रोप अचानक सुकले, तर ते अशुभ लक्षण मानले जाते. हे पैशाचे नुकसान दर्शवते. दुसरीकडे, जर तुळशीचे रोप पुन्हा-पुन्हा सुकत असेल, तर ते आयुष्यात काही वाईट घटना येण्याचे संकेत आहे.
घरात अचानक लाल मुंग्या दिसणे हे लक्षण आहे की, कुटुंबातील सदस्यांचा कोणत्याही व्यक्तीशी वाद होऊ शकतो. यासोबतच हे घरातील सदस्यांचे आजारपण किंवा पैशाचे नुकसान देखील सूचित करते. अशा वेळी त्यांच्याशी संबंधित उपाय आधीच केल्यास त्रास टाळता येईल.
एखाद्या व्यक्तीच्या घरात ठेवलेल्या वस्तू जसे की काच, बेड, खुर्ची, टेबल इ. जर अचानक तुटले, तर हे भविष्यात काहीतरी अमंगल होण्याचे संकेत देते.
ज्योतिष शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला दररोज घुबडाच्या रडण्याचा आवाज आला किंवा घराकडे पाहून घुबड रडत असेल, तर समजून घ्या की त्या घरात मोठा संकट येणार आहे. घुबडाचे रडणे कुटुंबातील सदस्याचा मृत्यू सूचित करते.
जर अचानक उंदीर, मधमाशी किंवा कोणत्याही प्रकारचे लहान जीव तुमच्या घरात येत असतील, तर ते देखील चांगले मानले जात नाही. अचानक किटक घरी येणं हे अशुभाचं लक्षण आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)