मुंबई : हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदापासून ते घरात शांती आणण्यासाठी तुळस ही महत्वाची आहे. भगवान विष्णू किंवा कृष्णालाही प्रसन्न करण्यासाठी तुळस ही फार महत्वाची आहे, कारण त्याशिवाय त्याची पूजा देखील अपूर्ण आहे. ज्या घरात तुळशीची पूजा लक्ष्मीच्या रूपात केली जाते, ज्या घरात पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता नसते. त्याशिवाय वास्तुशास्त्रात देखील तुळशीशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत. जे माहित असणे आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण यामुळेच आपल्या घरी सुख, समृद्धी आणि शांती नांदेल.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीमध्ये असे गुण आहेत जे भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबतही संकेत देतात. यासाठी तुळशीच्या रोपाची स्थिती पाहून अंदाज बांधावा लागेल.
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, ज्या घरात कोणतीही संकटे येणार आहेत, त्या घरात सर्वात आधी माता लक्ष्मी निघून जाते, कारण माँ लक्ष्मी कधीही दारिद्र्य, अशांतता, संकटाच्या ठिकाणी वास करत नाही. याशिवाय ग्रहांची स्थिती खराब असतानाही तुळशी संकेत देऊ लागते.
आपला वाईट काळ सुरु होणार आहे, यासाठी तुळस आपल्याला काय संकेत देते हे जाणून घ्या आणि सतर्क व्हा.
घरात लावलेल्या हिरव्या तुळशीचे रोप अचानक कोमेजून सुकायला लागले, तर ते संकटाचे लक्षण आहे. मात्र, कधी-कधी तुळशीचे रोप जास्त थंडीमुळे किंवा नीट सांभाळले जात नसल्याने सुकते. पण काळजी करूनही जर तुळशीचे रोप सुकत असेल, तर जाणून घ्या की बुध ग्रह अशांत असल्याचे हे लक्षण आहे. असे मानले जाते की जेव्हा बुध ग्रहाचा एखाद्या व्यक्तीवर वाईट प्रभाव पडू लागतो, तेव्हा त्याचा परिणाम घरात असलेल्या तुळशीवरही होतो, ज्यामुळे ती कोरडी होऊ लागते.
वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत केतूचा वाईट प्रभाव पडतो, त्यांच्या घरी असलेल्या तुळशीच्या झाडावर एकादा पक्षी आपलं घरटं बांधतो, तुमच्या ही घरातील तुळशीसोबत असं घडलं, तर समजा की, तुमच्या कुंडलीतील केतू आता अशांत होणार आहे.
वास्तूनुसार तुळस सुकणे किंवा तुळस पडणे हे देखील पितृदोषाचे कारण असू शकते. असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल, तर त्याच्या प्रभावाने घरात असलेली तुळसही सुकते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)