Weekly Horoscope 15 to 21 april 2024 : ग्रह गोचर आणि नक्षत्राचा खेळ पाहता बुधाची स्थिती अनेक राशींसाठी फायदेशीर आहे. तर मालव्य राजयोगामुळे हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. चैत्र नवरात्री आणि रामनवमी असलेला हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रेशर येणार असल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवा. व्यवसायिकांना अचानक आर्थिक फायदा होणार आहे. तरुणांना त्यांच्या आवडीच्या कामात संधी मिळणार आहे. प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. घरातमध्ये विजेशी संबंध अडचण जाणवणार आहे. कुटुंबासोबत सहलीचे प्लॅन ठरणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिवस: 15,19
ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास घडणार आहे. काही व्यवसायिक भागीदारासाठी काही लोकांशी बोलणार आहेत. त्यात मोठा करार होऊ शकतो. तरुणाने सतत नवीन शिकत राहायला पाहिजे. प्रेम जोडप्यांमध्ये वाद होण्याची भीती आहे. कुटुंबात सर्व ठिक असणार आहे. सर्वत्र आनंदी वातावरण असेल. त्वचेसंबंधित समस्या जाणवणार आहे.
शुभ दिवस: 15
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी काही वाद होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी प्रलंबित असलेल्या सरकारी कामांना अधिक वेळ लागणार आहे. अडकलेले पैसे मिळणार आहे. या आठवड्यात तरुणांचा अध्यात्माकडे कल वाढणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार आहे.
शुभ दिवस: 15,17,18
मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना कामाचा ताण जाणवणार आहे. व्यावसायिक भागीदाराकडून तुम्हाला मदत मिळणार आहे. या आठवड्यात समन्वय साधून काम करा. वाहन खरेदी करण्याचा विचार करणार आहात. पालक मुलांच्या वागण्यामुळे चिंतेत असणार आहेत. तुम्हाला या आठवड्यात पचनाची समस्या त्रासदायक ठरणार आहे. किरकोळ जखम होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 16, 17, 18, 19
या राशीच्या लोकांनी ऑफिसची कामं वेळेत पूर्ण करा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. त्यांना मोठी ऑर्डर मिळणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ आहे. तरुण मित्रांसोबत वेळ घालवणार आहेत. नवीन जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. नातेवाईकांशी संबंध गोड होणार आहे. तुमचं बीपीवर या आठवड्यात लक्ष द्या.
शुभ दिवस: 16,18
तुमच्या बदलीची शक्यता आहे. व्यावसायिकांची आर्थिक व्यवहार या आठवड्यात गडबडणार आहे. जोडप्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची तब्येत बिघण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रात सहभागी व्हा. तुम्हाला ताण जाणवणार आहे. गॅसचा त्रास होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 18,19
आरोग्य सेवेशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा आव्हानात्मक असणार आहे. व्यवसायिक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नफा मिळणार आहे. तरुणांना परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. रामनवमीला दान धर्म होणार आहे. हवामान बदलामुळे तब्येत नरमगरम असणार आहे.
शुभ दिवस: 15
कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होणार आहे. हे लक्षात घेऊन व्यवहार आणि सौद्यांमध्ये सावध राहा. राजकारणात सक्रिय तरुणांचा काळ चांगला असणार आहे. घरगुती वादात शांत राहणे हिताच ठरेल. नाही तर प्रकरण चिघळेल. पोटाशी संबंधित त्रास होणार आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घ्या.
शुभ दिवस: 15,18
कठोर परिश्रमाशिवाय तुम्हाला करिअरमध्ये प्रगती मिळणार नाही. तुम्ही वडिलोपार्जित व्यवसाय करत असाल तर कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्या. तरुण पार्टीच्या मूडमध्ये असणार आहे. मुलं आमि कुटुंबात थोडी चिंता असणार आहे. हात-पाय दुखण्याची समस्या तुमची डोकेदुखी ठरणार आहे.
शुभ दिवस: 18,19
कामाच्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या भूमिकेत असणार आहात. नवी नवीन गोष्टी तुम्ही शिकणार आहात. व्यवसायिकांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. आर्थिक अडचणीमुळे रखडलेली कामं पूर्ण होणार आहे. हा आठवडा तरुणांसाठी सकारात्मक असणार आहे. विद्यार्थी खेळात रुची घेणार आहेत. कुटुंबात ज्येष्ठांच्या आरोग्यामुळे तुम्ही चिंतेत असणार आहात.
शुभ दिवस: 15,17
कंपनीत खातं सांभाळणारे लोक या आठवड्यात कामात सतर्क राहा. सरकारी कंत्राटावर काम दिल्यामुळे व्यावसायिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. मित्रांशी काही कारणावरुन वाद होणार आहे. मुलांच्या लग्नासाठी चैत्र नवरात्र असल्याने देवीला साकड घाला. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ दिवस: 18,19
कामाच्या ठिकाणी महत्त्वाची मिटींग असणार आहे. त्या मिटिंगसाठी तयार राहा नाहीतर कामगिरीवर परिणाम होईल. अपेक्षित नफा मिळाल्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणुकीकडे वळू नये. तरुणांनी नियमाचे पालन करावे. कुटुंबात खर्च वाढणार आहे. थायरॉईड आणि शुगरचा त्रास होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 17
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)