Weekly Tarot Horoscope : 'या' राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ! साप्ताहिक टॅरो राशीतून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

Weekly Tarot Card Reading : फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सोबतच मार्च महिन्याची सुरुवात या दिवसांमध्ये सूर्य गुरू नक्षत्र बदल होणार आहे. त्यात कुंभ राशीत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. अशा स्थितीत हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या काय सांगते टॅरो तज्ज्ञ 

नेहा चौधरी | Updated: Feb 26, 2024, 08:14 AM IST
Weekly Tarot Horoscope : 'या' राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ! साप्ताहिक टॅरो राशीतून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे? title=
weekly tarot horoscope prediction reading 26 february to 3 march 2024 saptahik rashifal in marathi

Weekly Tarot Card Reading in Marathi : ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि टॅरो कार्ड हे आपल्याला भविष्यात होणाऱ्या गोष्टींचे संकेत देतात. या संकेतावरुन आपण आयुष्यात जरा सतर्क होतो. साप्ताहिक टॅरो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा आणि सोबतच मार्च महिन्याची सुरुवात कुठल्या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल जाणून घ्या. (weekly tarot horoscope prediction reading 26 february to 3 march 2024 saptahik rashifal in marathi)

मेष (Aries Zodiac)  

टॅरो कार्डनुसार तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तुम्हाला भरपूर लाभ देणार आहे. आरोग्यही चांगले राहणार आहे. कुठूनतरी चांगली बातमी मिळणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शॉर्टकट घेऊ नका.  

वृषभ (Taurus Zodiac) 

टॅरो कार्ड्सनुसार तुम्ही व्यस्त असणार आहात. एकाच वेळी अनेक कामं होत असल्यामुळे तुम्ही वेळेचा मागोवा गमावणार आहात. पण तुम्हाला त्याचा फायदाही होणार आहे. खर्च वाढणार आहे. पैशाची आवक कमी राहणार आहे.

मिथुन (Gemini Zodiac)

टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात तुम्हाला घरामध्ये काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तणाव आणि संघर्षाचे वातावरण असणार आहे. तुमचे आरोग्यही बिघडणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे.

कर्क (Cancer Zodiac)   

टॅरो कार्ड्सनुसार तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळणार आहे. म्हणून, धीर सोडू नका आणि पुढे चालत राहा. लव्ह लाईफमध्ये अडचणी येणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

सिंह (Leo Zodiac) 

टॅरो कार्ड्सनुसार, तुम्ही नात्यांबाबत गोंधळात पडणार आहात. ही परिस्थिती वैयक्तिक जीवनात तसंच कामाच्या ठिकाणी असणार आहे. संयमाने काम करणे चांगले असणार आहे. वेळेचा सदुपयोग करणे फायद्याच ठरेल. 

कन्या (Virgo Zodiac)    

टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत हा काळ संमिश्र असणार आहे. विद्यार्थ्यांनी इकडे-तिकडे लक्ष टाळलं पाहिजे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा अन्यथा महागात पडेल. 

तूळ (Libra Zodiac)  

टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात कोणतेही जोखमीचे काम करणं टाळा. विचार न करता गुंतवणूक करु नका अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेणार आहात. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)  

टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात धनलाभ होणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळणार आहे. नवीन काम हातात घेणार आहात. मुलांकडून आनंदाचे क्षण मिळणार आहे. आपण ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे टाळा. 

धनु (Sagittarius Zodiac) 

टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात तुमचं काम पूर्ण होणार आहे. नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला असणार आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ असणार आहे. वैयक्तिक आयुष्यही चांगले राहणार आहात. पण तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.  

मकर (Capricorn Zodiac)  

टॅरो कार्डनुसार वेळ सामान्य असणार आहे. मीडिया मार्केटिंगशी संबंधित लोकांना फायदा होणार आहे. नवीन योजना तयार करणार आहात. तुमची लोकप्रियता वाढणार आहे. तुमच्या प्रगतीमुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac) 

टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात तुम्हाला आराम मिळणार आहे. जुन्या अडचणी दूर होणार आहे. तुमच्या समस्यांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करून त्या सोडवणे अधिक योग्य ठरणार आहे. धीर धरा, वेळेनुसार गोष्टी सुधारणार आहेत. 

मीन  (Pisces Zodiac)  

टॅरो कार्डनुसार या आठवड्यात आर्थिक लाभ होणार आहे. पती-पत्नीचा वेळ चांगला जाणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होणार आहे. आरोग्यही चांगले राहणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)