Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग! 'या' लोकांवर होणार धनवर्षाव?

Weekly Tarot Horoscope Prediction 12 to 18 august 2024 in Marathi : श्रावणाच्या या आठवड्यात सूर्य सिंह राशीत असल्याने बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना सन्मान, प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभ मिळणार आहे. करिअरमध्येही अनेक नवीन चांगल्या संधी लाभणार आहे. टॅरो कार्ड्सपासून मेष ते मीन राशीपर्यंतच्या हा आठवडा कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य. 

नेहा चौधरी | Updated: Aug 10, 2024, 04:24 PM IST
Weekly Tarot Horoscope : श्रावणाचा दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग! 'या' लोकांवर होणार धनवर्षाव? title=
weekly tarot horoscope prediction tarot card reading for 12 to 18 august 2024 saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Tarot Horoscope Prediction 12 to 18 august 2024 in Marathi : श्रावणाच्या दुसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोग असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार बुधादित्य राजयोगामध्ये ज्ञान, आदर आणि वाणीतील गोडवाचा कारक असणार आहे. मिथुन, कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा हा आठवडा विशेषतः फलदायी असणार आहे. बुधादित्य राजयोग तुम्हाला केवळ सन्मान आणि आनंदच देईल असे नाही तर तुमच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा देणार आहे. चला तर मग मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी कसा असेल ऑगस्टचा हा आठवडा जाणून घेऊयात टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading 05 to 11 august 2024 saptahik rashi bhavishya in marathi)

मेष (Aries Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा हा आठवडा खूप आक्रमक असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात काहीतरी आंबट आणि काहीतरी गोड अनुभव येणार आहे. सध्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. या आठवड्यात गुरुवारनंतर, संबंध, संधी आणि विरोध तुमच्या आयुष्यात एकत्र धाड मारणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

टॅरो कार्डची गणना अशी दर्शवते की, या आठवड्यात उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक असणार आहे. रविवारी तुम्ही जिव्हाळ्याच्या क्षेत्रात निराश होणार आहात तर सोमवारी तुम्हाला तुमच्या अनुभवातून अनेक संधी मिळणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac) 

या राशीचे लोक या आठवड्यात कामासोबत आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.  कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंदच आनंद असणार आहे. पैशाचा अपव्यय टाळणे तुमच्या हिताच ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे हेच योग्य होईल. आपण तिच्याबद्दल विचार करत नाही असे तिला कधीही वाटू नये याची काळजी घ्या. 

कर्क (Cancer Zodiac)    

या राशीच्या लोकांच्या सर्जनशील प्रवृत्ती त्यांच्या शिखरावर असणार आहे. याशिवाय तुमचं लव्ह लाईफही खूप मजबूत राहणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले असणार आहेत. तुम्ही विजयाच्या मार्गावर पुढे जाणार आहात. तुम्हाला एकापाठोपाठ अनेक चांगल्या संधी लाभणार आहे. या आठवड्यात विद्यार्थी वर्गातील लोकांनी त्यांच्या अभ्यासाकडे थोडे अधिक लक्ष देणे आवश्यक असणार आहे.

सिंह (Leo Zodiac)  

या राशीच्या नोकरदार लोकांसाठी हा आठवडा खूप भाग्यवान असणार आहे. तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहे. तुम्ही सध्या काय करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. त्याला तुमची गरज लागणार आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांनी बाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेसाठी मजबूत व्यवस्था करणे गरजेचे आहे. तुमच्या कुटुंबातील कोणाशी वाद होणार आहे. तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी घाई करू नका, असे होऊ शकते की तुम्हाला प्रेम वाटत असलेल्या भावना केवळ आकर्षण असण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहे.

तूळ (Libra Zodiac)   

या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांमध्ये अधिक रस असणार आहे. तसंच तुमच्या व्यवसायात नवीन करार होणार आहे. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. प्रयत्न आणि सहकार्यामुळे अनुकूलता प्राप्त होणार आहे. नवीन संबंध फायदेशीर ठरणार आहेत. आर्थिक योजना राबवणे हिताच ठरेल. नवीन काम मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. वाहनामुळे इजा होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

ऑगस्टच्या या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्या आईसाठी थोडा त्रासदायक असणार आहे. या काळात माध्यमांशी संबंधित क्षेत्रातही लाभ मिळणार आहे. तुम्हाला दिखाऊपणापासून दूर राहणे हिताच ठरेल. या आठवड्यात तुमच्या नवीन योजनांची अंमलबजावणी होणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 

या आठवड्यात धनु राशीचे लोक नवीन कामांमध्ये खूप व्यस्त असणार आहेत. मात्र तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या किंवा स्वतःच्या आजारपणामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहणार आहात. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी काळ खूप चांगला असणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला नसणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये वैचारिक मतभेद होणार आहेत. विवाहित लोकांनाही या आठवड्यात सासरच्या मंडळींकडून तणावाचा सामना करावा लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर राहू नका, आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा हा आठवडा लव्ह लाइफच्या दृष्टीने थोडा कमजोर राहणार आहे. या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये काही अंतर येणार आहे. यासंबंधीच्या बाबी निर्णायक टप्प्यावर आणण्याची गरज नसणार आहे. कोणताही निर्णय संयमाने आणि शहाणपणाने घेणे हिताच ठरेल. आत्मविश्वासाचा अभाव वाटणार आहे. 

मीन  (Pisces Zodiac)  

या राशीच्या लोकांमध्ये भाऊ, बहिणी आणि नातेवाईकांच्या विचारांमध्ये समन्वयाची कमतरता राहणार आहे. सहकाऱ्यांशी संबंध देखील थोडेसे बिघडू शकतात. या आठवड्यात तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता जाणवणार आहे. तसंच तुमचे व्यक्तिमत्व कमकुवत वाटणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)