Weekly Tarot Horoscope : रुचक राजयोगामुळे 'या' लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 27 May to 2 June 2024 in Marathi : मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात मंगळ मेष राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे रुचक राजयोगाची निर्मिती होते. टॅरो कार्ड गणनेनुसार मेचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून     

नेहा चौधरी | Updated: May 26, 2024, 12:12 PM IST
Weekly Tarot Horoscope : रुचक राजयोगामुळे 'या' लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती! जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य title=
weekly tarot horoscope prediction tarot card reading for 27 May to 2 June 2024 saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Tarot Horoscope Prediction 27 May to 2 June 2024 in Marathi : बघता बघता मे महिन्याचा शेवटचा आठवडा आला आहे. या आठवड्यात मंगळ ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ गोचरमुळे रुचक राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य. (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 27 May to 2 June 2024 saptahik rashi bhavishya in marathi)

मेष (Aries Zodiac)  

या लोकांसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला सर्जनशील क्षेत्रात विशेष लाभ होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी असणार आहात. 

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नातेसंबंधांच्या बाबतीत काही चढ-उतार पाहिला मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत थोडा वेळ व्यतित करुन तुमचं मतभेद दूर करण्याच प्रयत्न करा. या आठवड्यात तुम्ही तुमचे संबंध सुधारण्यासाठी वेळ देणार आहात. विखुरलेल्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही तुमची ऊर्जा वापरणार आहात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा फार चांगला नसणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा तुम्हाला विजयाच्या मार्गावर घेऊ जाणारा ठरणार आहे. नोकरदारांच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. या आठवड्यात केलेल्या कामातून भविष्यात फायदा होणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. 

कर्क (Cancer Zodiac)   

या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सुधारणार असून नशिब चमकणार आहे. तुम्ही देश-विदेशात प्रसिद्ध होणार आहात. या आठवड्यात तुम्हाला पुरस्कार मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह मनोरंजनाच्या सहली आणि परदेशी सहलीला जाण्याचा बेत आखणारआहात. 

सिंह (Leo Zodiac) 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक परिस्थितीबाबत थोडी कठीण असणार आहे. ते बळकट करण्यासाठी तुम्ही केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ जाणार आहात. या आठवड्यात तुमचा काही पैसा सामाजिक आणि धार्मिक कार्यात खर्च होणार आहे. आईच्या बाजूने कोणत्याही कार्यक्रमात अडथळे येण्याची शक्यता आहे. 

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी आणि समाजात खूप लोकप्रियता मिळणार आहे. तसंच, या आठवड्यात तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आराम मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी असणार आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आनंदी वातावरणात वेळ घालवणार असून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. 

तूळ (Libra Zodiac)  

हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी प्रगती घेऊन आला आहे. व्यापारी आणि नोकरदारांनाही प्रगतीच्या संधी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही विजयाच्या मार्गावर वाटचाल करणार आहात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ लाभणार आहे. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या राशीच्या लोकांसाठी, मे महिन्याचा शेवटचा आठवडा मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत नवीन सुरुवातीचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला शेअर बाजारातून अधिक नफा मिळणार आहे. या आठवड्यात धीर धरणे तुम्हाला फायद्याच ठरणार आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमची तब्येत अचानक बिघडल्यामुळे कामात अडचणी येणार आहेत.

धनु (Sagittarius Zodiac) 

या राशीचे लोक आर्थिक बाबतीत थोडे कठीण असणार आहे. या आठवड्यात पैसावर खर्च कमी करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आपण त्यांच्याबद्दल विचार करत नाही असे त्यांना कधीही वाटू देऊ नका. जीवनातील अडचणींना घाबरु नका, चांगला वेळ लवकर येणार आहे. 

मकर (Capricorn Zodiac)   

या राशीच्या लोकांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही आठवडा कठीण असणार आहे. आपण विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्या आईसाठी आणि तुमच्यासाठी काहीसा त्रासदायक ठरणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या राशीच्या लोकांसाठी घरगुती तणावाचा असणार आहे. तुमच्या सासरच्यांसोबत काही वादामुळे तुम्ही तणावात असणार आहात. तुमची तब्येत थोडी नरम गरम असणार आहे. तुमची मुलं मोठी झाली असतील तर त्यांच्यावर विनाकारण तुमचे विचार लादू नका.

मीन  (Pisces Zodiac)  

या राशीच्या व्यापारी वर्गासाठी आठवडा फायदेशीर सिद्ध होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नफा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही धोका पत्करु शकता. शिवाय आपण आपल्या ध्येयांबद्दल पुरेसे गंभीर नसणार आहात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)