Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी ते भीष्मद्वादशीपर्यंत पितृदोषापर्यंत काही उपाय केल्यास त्यातून मुक्ती मिळते. 

नेहा चौधरी | Updated: Feb 16, 2024, 08:53 AM IST
Bhishma Dwadashi 2024 : भीष्माष्टमी व भीष्मद्वादशी म्हणजे काय?, पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय title=
What is Bhishmashtami and Bhishmadvadashi Do these measures to get rid of Pidro Dosha know tithi muhurat and significance in marathi

Bhishma Dwadashi 2024 : धार्मिकशास्त्रानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी भीष्माष्टमी आणि द्वादशी तिथीला भीष्म द्वादशी पाळली जाते. भीष्म द्वादशी ला गोविंद द्वादशी असंही म्हटलं जातं. भीष्माष्टमीला पितृदोषापासून मुक्त मिळवण्यासाठी शुभ मानली जाते. तर भीष्म द्वादशीला धन, सुख, सौभाग्य आणि संतान प्राप्तीसाठी व्रत करणं चांगल मानलं जातं. (What is Bhishmashtami and Bhishmadvadashi Do these measures to get rid of Pidro Dosha know tithi muhurat and significance in marathi)

 कधी आहे भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी?

पंचांगानुसार भीष्माष्टमी तिथी 16 फेब्रुवारीला असून भीष्म द्वादशी तिथी 21 फेब्रुवारी 2024 ला आहे.
भीष्माष्टमी दिवशी भीष्म पितामहांनी प्राणार्पण केलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ धर्मशास्त्रानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ते द्वादशी भीष्माचार्य यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. 

भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी व्रत विधी 

धर्णशास्त्रानुसार इतर सणाच्या व्रतानुसार भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशीचं व्रत नसतं. या तिथीच्या दिवशी भीष्मांचार्यांचं स्मरण केलं जातं. या दिवशी सूर्याला तीळ आणि पाण्याचं अर्घ्य अर्पण करा. ज्या लोकांना संततीची प्राप्ती हवी असेल त्यांनी अष्टमी तिथीपासून दररोज सूर्याला अर्घ्य अपर्ण केल्यास संतती प्राप्त होते, अशी शास्त्रात मान्यता आहे. त्याशिवाय सूर्यदेवाची रोज उपासणा केल्यामुळे तेज, बुद्धी, शक्तीचा लाभ मिळतो असा विश्वास आहे. सूर्य पूजेसह सूर्यनमस्कार केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो असं म्हणतात. जर सूर्याच्यावेळी सूर्यपूजा करता आली नाही तर सूर्यास्ताच्या वेळी भीष्माचार्यांचं स्मरण करुन सूर्याला नमस्कार केला तरी हरकत नाही, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय भीष्म द्वादशीला विष्णूच्या लक्ष्मीनारायण रूपाची तसंच श्रीकृष्णाची पूजा केली जाते. 

पितृदोषातून मुक्तता  

धर्मात पितृदोषापासून मुक्तीसाठी भीष्माष्टमी आणि भीष्म द्वादशी तिथी अतिशय महत्त्वाची मानली जीते. यादिवशी पितरांचं श्राद्ध आणि तर्पण करुन पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी यादिवशी पितरांचं श्राद्ध आणि तर्पण करावं. यादिवशी विधी झाल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणेसह तीळ दान करणे महत्त्वाचं असतं. त्यातून पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. त्याशिवाय या दिवशी तिळाचं सेवन केल्यास पाप नष्ट होतात आणि प्रत्येक कामात यश मिळतं अशी मान्यता आहे. 

माघे मासि सिताष्टम्यां सतिलं भीष्मतर्पणम्।
श्राद्धच ये नरा: कुर्युस्ते स्यु: सन्ततिभागिन:।।

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, जो व्यक्ती माघ शुक्ल अष्टमी ते द्वादशी काळात भीष्मासाठी तर्पण, जलदान वगैरे करता त्याला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यास मदत होते. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)