Sex Life Astrology : ज्योतिषशास्त्रात कुंडलीमधील ग्रहांच्या स्थितीवर जाचकाची आर्थिक स्थिती, करिअर, वैवाहिक जीवन, मुलं बाळ आणि नातेसंबंधाबद्दल भाकित केलं जातं. आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत, स्वर्गात जोड्या देव ठरवतो. पृथ्वीवर फक्त एकमेकाशी भेट घडते. पण असं प्रत्येक वेळी घडतंच असं नाही. तुमचे विचार जुळले की मनं जुळतात. लग्नाची नाती ही प्रेम, आदर आणि विश्वासाच्या पायावर उभी असतात.
नात्याची आणखी एक बाजू असते ती म्हणजे पती- पत्नीमधील जवळीक. पण लग्नापूर्वी नात्यातील Intimacy बद्दल काही गोष्टींचा अंदाज येतच नाही. अनेकदा नातं तुटण्यासाठीही या गोष्टी कारणीभूत ठरतात. यासाठी ज्योतिषशास्त्र पंडितांनी पती- पत्नी किंवा Couple च्या नात्यात Intimacy साठीही काही गोष्टी सांगितल्या आहेत. कुठली रास कुठल्या राशीसाठी बेस्ट आहे याबद्दलची माहितीही इथं दिली आहे.... जाणून घ्या (which are the most sexually compatible zodiac signs astrology news )
कुंभ आणि मिथुन या राशीच्या लोकांचे सेक्स लाइफ एकदम उत्तम असतं. ते एकमेकांच्या प्रेमात वेडे असतात.
मेष आणि धनु या दोन्ही राशीची लोक खूप उत्साही आणि आनंदी असल्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ छान असतं.
वृश्चिक आणि कर्क या दोन्ही रास खूप पॅशनेट असतात. त्यामुळे ही लोक कुठल्याही वेळात किंवा परिस्थितीत मार्ग काढून आनंदी राहतात. त्यामुळे यांचं सेक्स लाइफ जबरदस्त असतं.
कुंभ आणि सिंह या राशीच्या लोकांच्या सेक्सबद्दल अनेक फॅटन्सी असतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांसाठी उत्तम जोडीदार असतात.
कन्या आणि मकर राशींची लोक एकमेकांसाठी बनली आहेत असा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ पण एकदम बेस्ट असतं.
सिंह आणि धनु राशीचं सेक्स लाईफ सगळ्यात बेस्ट असतं. या लोकांना नवीन नवीन गोष्टी कराला आवडतात. त्यामुळे त्यांचं सेक्स चांगल असतं.
मीन आणि कर्क या राशीचे लोक खूप भावनिक असतात. त्यामुळे त्यांचं सेक्स लाइफ छान जुळून येतं.
मिथुन आणि तुळ या दोघेही शारीरिक संबंधाबद्दल बेस्ट पार्टनर असतात. यांना वेगवेगळ्या पोझिशन ट्राय करायला आवडतं.
वृषभ आणि मकर राशींची लोक लाइफ पार्टनर म्हणून बेस्ट असतात. त्यांचं शारीरिक संबंध खूप चांगले असतात. या दोन्ही रास फार प्रामाणिक असतात.