मुंबई : प्रत्येक धातूला ज्योतिषशास्त्रात महत्व आहे. त्यात्या राशीप्रमाणे आणि गुणधर्मांनुसार ज्योतिषशास्त्रात लोकांना वेगवेगळ्या धातूचा वापर करण्यासाठी किंवा त्याची अंगठी, तसेच दागिना घालण्याचा सल्ला दिला जातो. त्याच प्रमाणे सोनं परिधान करणं देखील शुभ मानलं जातं. याशिवाय कुंडलीतील ग्रह दोष दूर करण्यासाठी सोने, चांदी किंवा इतर धातूंमध्ये अनेक रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. सोन्याकडे समृद्धीचं प्रतिक म्हणून पाहिले जाते. ज्यामुळे 10 पैकी 9 व्यक्तींकडे तुम्हाला सोनं पाहायला मिळेल. परंतु तुम्हाला माहितीय का? की सोनं हा धातू म्हणून सगळ्याच राशींच्या लोकांसाठी फायदेशीर नाही.
सोनं कोणत्या राशींच्या लोकांसाठी चांगलं आणि कोणत्या राशींच्या लोकांसाठी नुकसानकारक आहे हे जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी आहे. वास्तविक, सोन्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव आहे. अशा स्थितीत हे धातू धारण केल्याने त्या व्यक्तीचा गुरू ग्रह मजबूत होतो आणि जीवनात धन, वैभव आणि सुख-समृद्धी येते.
मेष : या राशीच्या लोकांसाठी सोन्याची अंगठी घालणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. तसेच कर्जातून मुक्ती मिळते.
सिंह : या राशीसाठी सोने फायदेशीर ठरू शकते. वास्तविक या राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. सूर्य आणि गुरू ग्रह यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे या राशीच्या व्यक्तीने सोने परिधान करावे.
कन्या : या राशीच्या लोकांसाठीही सोने लाभदायक असल्याचे सांगितले जाते. या राशीचे लोकांना सोनं घातल्याने भरपूर यश मिळतं, तसेच आर्थिक स्थितीही चांगली आहे.
धनु : या राशीचा स्वामी गरू आहे आणि सोन्याचा बृहस्पतिशी विशेष संबंध असल्याचे मानले जाते. या राशीच्या व्यक्तीने सोने परिधान करणे शुभ असते. तसेच त्यांना प्रत्येक कामात यश मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांनी सोने घालू नये. तर दुसरीकडे, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी सोनं घातलं तर चालेल, परंतु दररोज त्यांनी सोनं घालू नये असा सल्ला दिला जात आहे.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)