कोण आहे लाफिंग बुद्धा? ज्यांना मानलं जातं पैसे आणि समृद्धीचं प्रतीक...

अनेक लोक म्हणतात की ते जिथे जायचा तिथे गर्दी असायची आणि लोक त्यांना भेटायला यायचे.

Updated: May 17, 2022, 09:09 PM IST
कोण आहे लाफिंग बुद्धा? ज्यांना मानलं जातं पैसे आणि समृद्धीचं प्रतीक... title=

मुंबई  :  लाफिंग बुद्धाची मूर्ती अनेकांच्या घरात ठेवल्याचे तुम्ही पाहिले असेल. ऐवढेच काय तर आपण देखील अनेकांना लाफिंग बुद्धाची मूर्ती गिफ्ट म्हणून देतो. असे म्हणतात की कोणालाही लाफिंग बुद्धाची मूर्ती दिल्याने किंवा ती घरात ठेवल्याने घरी संपत्ती आणि ऐश्वर्य नांदते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की हे लाफिंग बुद्ध नक्की आहे तरी कोण आणि या मूर्तीचा प्रगती, समृद्धी इत्यादींशी काय संबंध आहे? चला तर मग जाणून घेऊया माहिती

लाफिंग बुद्ध हे जपानचे होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक शिष्यांपैकी ते एक होते. असे म्हणतात की त्यांना आत्मज्ञान प्राप्त होताच ते हसायला लागला. ते गावोगावी जाऊन एकमेकांना हसवायची आणि गावकरी त्याच्यावर खूप खुश होते. हसणे ही त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांना लाफिंग बुद्ध हे नाव देण्यात आलं.

असे मानले जाते की गौतम बुद्धांच्या इतर शिष्यांप्रमाणे त्यांनी प्रवचने किंवा भाषणे दिली नाहीत, तर नेहमी हसण्याचा संदेश दिला. अनेक लोक म्हणतात की ते जिथे जायचा तिथे गर्दी असायची आणि लोक त्यांना भेटायला यायचे.

लोकांना त्यांना भेटून खूप आनंद व्हायचा आणि त्यामुळेच त्यांना सकारात्मकतेशी जोडले गेले आहे. कधीही कोणी रडू नये आणि नेहमी हसत राहावे, अशी त्यांची धारणा होती.

लाफिंग बुद्धाचे अनेक प्रकार आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या लाफिंग बुद्धांसाठी वेगळी कथा आहे. ज्याच लाफिंग बुद्धचे हात वर आहेत, तो लाफिंग बुद्ध प्रगती करतो असे म्हणतात.

लाफिंग बुद्धा झोपल्याने नशीब खुलते आणि लाफिंग बुद्ध बंडल घेऊन असेल तर पैशाची कमतरता दूर होते. तसेच ज्या लाफिंग बुद्धच्या हातात पिशवी असते त्यांना व्यवसायासाठी शुभ मानले जाते.