Mangal Ast 2023: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. तर यामध्ये काही ग्रह अस्त आणि उदय होतात. मंगळ, धैर्य आणि पराक्रमाचा कारक आणि ग्रहांचा सेनापती मानला जातो. सध्या मंगळ ग्रह अस्त झाला आहेत.
13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.26 वाजता कन्या राशीत अस्त झाला. त्यानंतर 23 जानेवारी 2024 मंगळ ग्रहाचा उदय होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशींच्या जीवनावर विविध प्रकारे परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया मंगळाच्या अस्त स्थितीमुळे कोणत्या राशींचा जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.
मंगळाच्या अस्तामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या चांगल्या कामामुळे सर्वजण तुमची प्रशंसा करतील. चांगली नोकरी शोधणारे लोक यश मिळवू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही शत्रूंवर वर्चस्व गाजवाल.
या राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहाची स्थिती फायदेशीर ठरू शकते. व्यवसायातच नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करून यश संपादन करू शकाल. आर्थिक स्थितीही सुधारू शकते. करिअरच्या क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये नवी ओळख मिळेल. शेअर मार्केट आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची आहे ते करू शकतात.
मंगळाची स्थिती या राशीसाठी संमिश्र परिणाम देऊ शकते. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती थोडी मजबूत होऊ शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल. व्यावसायिकांचे अडकलेले पैसे यावेळी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना यश मिळू शकते. मोठ्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )