मुंबई : महिला वर्ल्ड कपच्या फायनलला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रतिसाद मिळाल्याच आयसीसीनं मान्य केलं आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये झालेली फायनल ही तब्बल १८ कोटी लोकांनी पाहिली असल्याचं आयसीसीनं प्रसिद्धीपत्रक काढून सांगितलं आहे.
भारत आणि इंग्लंडमधली ही फायनल पाहण्यामध्ये सर्वात जास्त भारतातले प्रेक्षक होते. भारतातून तब्बल १५ कोटी ६० लाख प्रेक्षकांनी ही मॅच पाहिली. मुख्य म्हणजे ग्रामीण भागतल्या ८० लाख प्रेक्षकांनी ही फायनल पाहिली.
२०१३मध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलपेक्षा यंदाची फायनल पाहणाऱ्यांची संख्या तब्बल ३०० टक्क्यांनी वाढली आहे. इंग्लंडविरुद्धच्या रोमहर्षक फायनलमध्ये भारताचा केवळ ९ रन्सनी पराभव झाला होता.