इंग्लंड विरुद्ध भारताच्या पराभवाची 5 मोठी कारणं

या 5 कारणांमुळे भारताचा दुसऱ्या वनडेत पराभव

Updated: Jul 15, 2018, 10:19 AM IST
इंग्लंड विरुद्ध भारताच्या पराभवाची 5 मोठी कारणं title=

मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्य़ा दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंडने 322 रनचा डोंगर टीम इंडियापुढे उभा केला. टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी निघालेल्या भारतीय संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. विकेट पडून देखील इंग्लंडच्या टीमवर कोणताही फरक पडलेला दिसत नव्हता. पण टीम इंडियावर प्रत्येक विकेटनंतर दबाव वाढत गेला. या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या पराभवामागची 5 मोठी कारणं काय आहेत जाणून घेऊया.

1. इंग्लंडची शानदार सुरुवात

इंग्लंडने आधी फलंदाजी करत पहिल्या 5 ओव्हरमध्ये फक्त 27 रन केले. पण या दरम्यान त्यांनी एकही विकेट नाही गमावली. सुरुवातीला इंग्लंडच्या फलंदाजांनी रन बनवण्यासाठी कोणतीही घाई नाही केली. पण नंतर त्यांनी फोर आणि सिक्सने हल्ला सुरु केला. पहिल्या ओव्हरपासून इंग्लंडने विकेट न गमवता हळू पण चांगली सुरुवात केली.

2. विकेट पडल्यानंतरही रनरेट कायम

11व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवने त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये इंग्लंडला झटका दिला. जॉनी बेयरस्टॉला बोल्ड त्याने केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने कुलदीपने जेसन रॉयला 40 रनवर माघारी पाठवलं. 15 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर दो विकेटच्या नुकसानीवर 88 रन होता. त्यानंतर 20 ओव्हरपर्यंत इंग्लंडने 121 रन केले. विकेट गमवल्यानंतर ही इंग्लंडच्या फलंदाजांनी इनिंग सांभाळली. याचा फायदा त्यांना मोठा स्कोर उभा करण्यात झाला. 

3. पार्टनरशिप आणि वेगवान खेळी

इंग्लंड टीमच्या विजयामध्ये पार्टनरशिपचा मोठा वाटा होता. यामुळे ते 322 रन करु शकले. पहिल्या विकेटसाठी बेयरस्टॉ आणि जेसन रॉयमध्ये 69 रनची पार्टनरशिप झाली. त्यानंतर मोर्गन आणि रूटमध्ये 103 रनची पार्टनरशिप झाली. यानंतर रूट आणि मोईन अली यांच्यामध्ये 25 रन, रूट आणि डेविड विली यांच्यात 83 रनची पार्टनरशिप झाली. विली आणि रूटने 52 बॉलमध्ये 83 रनची पार्टनरशिप केली. जो रूटने 116 बॉलमध्ये नाबाद 113 रन केले. डेविड विलीने 31 बॉलमध्ये 50 रन केले.

4. भारताला सुरुवातीलाच 3 मोठे झटके

टीम इंडियाची फलंदाजी ही सुरुवातीला इंग्लंड प्रमाणेच राहिली. पहिल्या ओव्हरपासू सावध खेळी करत टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न गमवता 28 रन केले. शिखर धवन 13 बॉलमध्ये 17 रन तर रोहित शर्मा 17 बॉलमध्ये 8 रन करत खेळत होता. 9व्या ओव्हरमध्ये रोहितच्या विकेटनंतरही टीम इंडियावर कोणता मोठा फरक दिसत नव्हता. पण 10व्या ओव्हरमध्ये शिखर धवनची विकेट आणि मग केएल राहुलची शून्यावर विकेट गेल्यानं टीम इंडियाची इनिंग डगमळली. कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्यावर दबाव आला. त्यांनी ही आपल्या विकेट गमावल्या.

5. भारताचा कमी रन रेट

विकेट पडल्यानंतर ही टीम इंडिया रन रेट कायम ठेवण्यात अपयशी ठरली. कोणाही मोठी पार्टनरशिप नाही करु शकले. पण इंग्लंडच्या बाबतीत हे उलट होतं. 10 ओव्हरमध्ये भारताचा स्कोर दोन विकेटवर 57 रन, तीन विकेट पडल्यानंतर 13व्या ओव्हरला 70 रन, 15व्या ओव्हरला 87, 20 ओव्हरला 109 रन तर 25व्या ओव्हरमध्ये 132 रन होता. यावरुन असं दिसतं की टीम इंडिया दबावामध्ये खेळत होती.