'या' 8 वर्षांच्या चिमुकल्यानं खेळला हेलिकॉप्टर आणि 360 डिग्री शॉट, व्हिडीओ

या चिमुकल्याची स्टम्पनं केलेली बॅटिंग पाहून तुम्ही व्हाल थक्क

Updated: May 15, 2021, 06:30 PM IST
'या' 8 वर्षांच्या चिमुकल्यानं खेळला हेलिकॉप्टर आणि 360 डिग्री शॉट, व्हिडीओ

मुंबई: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 9 वर्षांच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसाच पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकल्यानं महेंद्रसिंह धोनीचा फेमस हेलिकॉप्टर शॉट आणि एबी डिव्हिलियर्सचा प्रसिद्ध 360 डिग्री शॉट मारण्याचा प्रयत्न केला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात हा मुलगा स्टम्पने हे शॉट्स परफेक्ट मारण्याचा सराव करत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 

8 मे रोजी असाच एका 9 मुलाचा व्हिडीओ फरफेक्ट शॉट्स खेळताना व्हायरल झाला होता. या चिमुकल्याचा व्हिडीओ राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनने आपल्या फ्रेंचायझीपर्यंत पोहोचवला आणि त्याला स्पॉन्सर करणार असल्याची चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाली आहे.