आमिर-विराट चॅट शोमध्ये येणार एकत्र

बॉलीवूड स्टार आमिर खान आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका चॅटशो दरम्यान एकत्र दिसणार आहे. दिवाळीनिमित्त प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये आमिर आणि कोहली पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

Updated: Oct 3, 2017, 05:24 PM IST
आमिर-विराट चॅट शोमध्ये येणार एकत्र title=

मुंबई : बॉलीवूड स्टार आमिर खान आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका चॅटशो दरम्यान एकत्र दिसणार आहे. दिवाळीनिमित्त प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये आमिर आणि कोहली पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

आपल्या आगामी सिक्केट सुपरस्टारच्या प्रमोशमनमधून सुट्टी घेऊन आमिर तीन ऑक्टोबरला या शोसाठी शूटिंग करतोय. सिनेमाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा आमिर आणि कोहली एकाच मंचावर दिसणार आहेत. 

आमिरचा आगामी सिक्रेट सुपरस्टार हा सिनेमा १९ ऑक्टोबरला रिलीज होतोय. आमिर खान सिंगापूरमध्ये आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. तर दुसरीकडे टीम इंडिया रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिज संपल्यानंतर काही दिवसांसाठी फ्री झालाय. 

विराट शक्यतो आपल्या पर्सनल लाईफबद्दल मीडियामध्ये कोणतेही विधान करत नाही. दरम्यान अनुष्कासोबतच्या त्या अफेयरबद्दलच्या चर्चा वारंवार मीडियामध्ये येतच असतात.