एबी डिव्हिलियर्सने पत्नीसोबत गायलं गाणं, अनुष्का शर्मा आणि मॅक्सवेलनं दिली प्रतिक्रिया, व्हिडीओ

डिव्हिलियर्सचा हटके अंदाज, पत्नीसोबत गायलं गाणं

Updated: Jun 2, 2021, 04:25 PM IST
एबी डिव्हिलियर्सने पत्नीसोबत गायलं गाणं, अनुष्का शर्मा आणि मॅक्सवेलनं दिली प्रतिक्रिया, व्हिडीओ

मुंबई: IPLमध्ये 360 डिग्री शॉटने मैदानात फलंदाजी करताना धुमाकूळ घालणाऱ्या रॉलय चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आणि दक्षिण अफ्रिकेचा खेळाडू ए बी डिव्हिलियर्सचा हटके अंदाज सोशल मीडियावर पाहायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानाबाहेर खेळा व्यतिरिक्त डिव्हिलियर्सने वेगळं काहीतरी केलं आणि ते सोशल मीडियावर देखील चाहत्यांना खूप पसंत पडलं आहे. 

डेव्हिलियर्सने त्याच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नीसोबत खास आवडतं गाणं गायलं आहे. त्याचा व्हिडीओ डिव्हिलियर्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. डिव्हिलियर्स IPL स्थगित झाल्यानंतर आपल्या घरी परतला होता. त्याला 14 दिवस क्वारंटाइन राहावं लागलं होतं. त्यानंतर तो घरी परतला. त्याने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास त्याचं आवडतं गाणं गायलं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AB de Villiers (@abdevilliers17)\

अनुष्का आणि मॅक्सवेलची प्रतिक्रिया

डिव्हिलियर्सच्या गाण्यावर मॅक्सवेलनं खास कमेंट केली आहे. अनुष्का शर्माने देखील पोस्ट लाईक केली असून प्रतिक्रिया दिली आहे. मागच्यावेळी पेक्षा चांगली प्रगती आहे अशा आशयाची कमेंट मॅक्सवेलनं दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आता पुन्हा माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर आयपीएलमध्य़े डिव्हिलियर्सच्या 360 शॉटची तुफान चर्चा रंगली होती. 

IPL 2021चे उर्वरित 31 सामने UAEमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या सामन्यांचं श्येड्युल अद्याप आलं नसलं तरी टी 20 वर्ल्ड कपआधी हे सामना होणार आहेत. डिव्हिलियर्स IPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे.