गब्बर आणि कोहलीसोबत खेळायचा...क्रिकेट सोडल्याने 'या' अभिनेत्याला होतोय पश्चाताप

हा अभिनेता क्रिकेट सोडून अभिनयाकडे का वळला? आपलं स्वप्न सांगताना म्हणाला...

Updated: May 30, 2021, 12:05 PM IST
गब्बर आणि कोहलीसोबत खेळायचा...क्रिकेट सोडल्याने 'या' अभिनेत्याला होतोय पश्चाताप title=

मुंबई: शिखर धवन म्हणजे गब्बरच्या फलंदाजीचे चाहते तुफान आहेत. B टीमची धुरा सध्या शिखर धवनच्या खांद्यावर आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन तयारी करत आहे. तर दुसरीकडे किंग कोहली टीम Aसोबत इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे. न्यूझीलंड विरुद्धचा हा सामना ड्युक बॉलनं खेळला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. 

याच दरम्यान एक अभिनेता चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे त्याने सांगितलं की तो शिखर धवन आणि विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळला होता. या अभिनेत्याचं नाव आहे करण वाही. करण हा लहानपणापासून क्रिकेटमध्ये करियर करण्यासाठी धडपड होता. पण खेळानं हवी तशी साथ न दिल्याने त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली. 

 करण शिखर धवनसोबत दिल्लीमध्ये अंडर 19 मधून खेळला आहे. यासंदर्भात त्याने खुलासा केला आहे. 2017मध्ये मीडियाला दिलेल्या मुलाखती दरम्यान करणने याबाबत सांगितलं. 'मी अंडर 19 मधून DDCAसाठी खेळलो होतो. मात्र त्यावेळी जास्त पुढे जाण्याची संधी मला मिळू शकली नाही.'

UAEमध्ये IPL 2021 शिफ्ट केल्यानंतर धनश्रीला आली दुबईची आठवण, शेअर केला व्हिडीओ

करण पुढे म्हणाला की, 'ते दिवस खूपच छान होते. मी ते कधीही विसरणार नाही. मी क्रिकेट सोडल्याचा पश्चिताप मला आता होत आहे. मला क्रिकेटमध्ये करियर करायचं होतं. 2003मध्ये मी त्यातून बाहेर पडलो आणि अभिनय क्षेत्राकडे वळलो.'

करण वाहीची विराट कोहलीशीही चांगली मैत्री आहे. एकदा करणने रेडिओसिटीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की कोहलीला खायला खूप आवडतं. तो फूड शौकीन आहे असंही करण त्यावेळी म्हणाला होता. 

कॅप्टन कूलसोबत आहे कसं नातं? विराट कोहलीनं 2 शब्दात सांगितलं...

क्रिकेट सोडल्यानंतर करणनं 2004मध्ये रीमिक्स टीव्ही सीरियलमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्यानंतर दिल मिल गए, कुछ तो लोग कहेंगे, तेरी मेरी लव स्टोरीज यासारख्या सीरियलमधून त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या. 

दावत-ए इश्क, हेट स्टोरी-4 सारख्या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या Sacred Games वेब सीरिजमध्ये करण वाहीने करण मल्होत्राची भूमिका साकारली होती.