IND vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी कांगारूंना सर्वात मोठा धक्का; 'हा' बडा खेळाडू झाला संघातून 'आऊट'

IND vs AUS 3rd Test: दिल्ली टेस्टनंतर (Delhi Test) वॉर्नर दिल्लीत फिरताना दिसला होता. त्यामुळे वॉर्नर खरंच जखमी आहे का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.

Updated: Feb 21, 2023, 03:28 PM IST
IND vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी कांगारूंना सर्वात मोठा धक्का; 'हा' बडा खेळाडू झाला संघातून 'आऊट' title=
David Warner

IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेत (Border Gavaskar Trophy)  टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी मिळवली आहे. सगल दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये वापसीसाठी काँगारूंना पुढचे दोनही कसोटी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागतील. अशातच आता काँगारूंना धक्कावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) मायदेशी परतला होता. कमिन्सच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्याचं कारण देत पॅट कमिन्स संघाला वाऱ्यावर सोडून निघून गेला आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) जखमी असल्याने मायदेशी परतणार आहे.

सिराजच्या माऱ्यासमोर वॉर्नर (David Warner) फेल -

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सिराजने दिवसाच्या सुरुवातीपासूनच डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) बाऊन्सरचा वर्षाव केला. 10 व्या षटकातील एक चेंडू वॉर्नरच्या हेल्मेटला लागला आणि दुसरा चेंडू त्याच्या उजव्या कोपराला लागला. त्यामुळे वॉर्नरला दुखापतीचा (David Warner injury) सामना करावा लागलाय. त्यामुळे तो दुसऱ्या डावात मैदानात उतरला नाही. 

दिल्ली टेस्टनंतर (Delhi Test) वॉर्नर दिल्लीत फिरताना दिसला होता. कुटुंबासह वॉर्नर ताजमहाल आणि इतर ठिकाणी फिरताना दिसला होता. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. त्यामुळे वॉर्नर खरंच जखमी आहे का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.

आणखी वाचा - IND vs AUS: "10 रुपये की पेप्सी, वॉर्नर भाई..." अन् LIVE सामन्यात प्रेक्षकांनी घेतली वॉर्नरची फिरकी, Viral Video

दरम्यान, पॅट कमिन्स इंदूरमध्ये 1 मार्चपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी परतणार आहे. जर पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतात परतला नाही तर इंदूर कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियाची कमान सांभाळू शकतो. अशातच वॉर्नर नसल्याने उस्मान ख्वाजाच्या खांद्यावर जबाबदारी असणार आहे.

Border gavaskar मालिकेत 2-0 ने आघाडी 

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 113 डावांवर गुंडाळल्यानंतर आता भारताचा विजयासाठी  115 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 1 रनची लीड घेतली होती. त्यानंतर आता भारत हा सामना जिंकेल, अशी अपेक्षा असताना टीम इंडियाने दणक्यात विजय मिळवला आहे.