विजयानंतर धोनीने आधी खाली चादर पसरवली अन मग या खेळाडूचा असा साजरा केला वाढदिवस

 इंडियन प्रीमियर लीगचा नवीन चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत ट्रॉफी जिंकली. 

Updated: Oct 16, 2021, 05:50 PM IST
विजयानंतर धोनीने आधी खाली चादर पसरवली अन मग या खेळाडूचा असा साजरा केला वाढदिवस

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा नवीन चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत ट्रॉफी जिंकली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील या संघाने चौथी वेळ ट्रॉफी जिंकली आहे. या सामन्यातील टर्निंग पॉईंट शार्दुल ठाकूरची ओव्हर ठरली. ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. फायनल जिंकल्यानंतर, तारीख बदलली आणि शार्दूल ठाकूरचा वाढदिवस संपूर्ण टीमने दणक्यात साजरा केला.

चेन्नईच्या टीमने वाढदिवसाचा केक कापत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये कर्णधार धोनीसह सर्व खेळाडू आपापल्या शैलीत वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर संघाने शार्दुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत केक कापून हा दिवस कायमचा खास आणि संस्मरणीय बनवा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

व्हिडिओमध्ये कर्णधार धोनी सहकारी खेळाडूसोबत जमिनीवर चादर टाकताना दिसत आहे. कारण वाढदिवसाचा केक कापताना धोनीने जे काही घडणार होते त्याची योजना आखली होती. मास्टर माइंड माहीने चादर घातली कारण खाली घाण होऊ नये. शार्दुलने केक कापण्यास सुरुवात केली. धोनीने त्याला केक खाऊ घातला त्यानंतर बाकीच्या साथीदारांनी त्याच्यावर भरपूर ड्रिंग ओतली.