IPL 2021 KKR vs CSK : महेंद्रसिंह धोनी दुसऱ्यांदा होणार बाबा?

धोनी पुन्हा एकदा चाहत्यांना गुडन्यूज देण्याची शक्यता

Updated: Oct 16, 2021, 04:13 PM IST
IPL 2021 KKR vs CSK : महेंद्रसिंह धोनी दुसऱ्यांदा होणार बाबा?

दुबई: चेन्नई संघाने कोलकाता संघावर 27 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईनंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकणारा चेन्नई दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईने आतापर्यंत आयपीएलमध्ये 4 वेळा चॅम्पियनशिप मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या कोलकाता विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नई संघाने सेलिब्रेशन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

चेन्नईच्या विजयाने कॅप्टन कूल धोनी खूप आनंदी आहे. धोनी पुन्हा एकदा एक उत्तम कॅप्टन असल्याची चर्चा आणि चेन्नईचा विजय या दोन्ही गोष्टींसोबत धोनी आणखी एका गोष्टीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनी पुन्हा एकदा चाहत्यांना गुडन्यूज देण्याची शक्यता आहे. धोनी पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची चर्चा आहे. 

धोनीची पत्नी दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. CSKच्या सेलिब्रेशन दरम्यान साक्षी आपलं पोट लपवताना दिसली. इतकच नाही तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमुळे आता धोनी पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत धोनी किंवा साक्षीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 

एका ट्वीटर युझरने सोशल मीडियावर पोस्ट करत दावा केला आहे की ही बातमी खरी आहे. प्रियांका रैनाने या वृत्ताला दुजोरा दिल्याचा दावा एका ट्वीटर युझरने केला आहे. प्रियांका रैनाने साक्षी प्रेग्नंट असल्याच्या बातमीला दुजोरा दिल्याचं ट्वीट एका युझरने केलं. सोशल मीडियावर आता याची तुफान चर्चा होत आहे. आता याबाबत अधिकृतपणे साक्षी धोनी कधी बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.