close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अजिंक्य रहाणेच्या मुलीचा फोटो पाहिलात?

अजिंक्यच्या मुलीचं नाव... 

Updated: Nov 8, 2019, 08:21 AM IST
अजिंक्य रहाणेच्या मुलीचा फोटो पाहिलात?

मुंबई : भारतीय कसोटी सामन्याचा उपकॅप्टन अजिंक्य रहाणे आणि पत्नी राधिकाला कन्यारत्नाचा लाभ झालाय. 5 ऑक्टोबर रोजी राधिकाने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंतर इंस्टाग्रामवर पहिल्यांदा अजिंक्य रहाणेने फोटो शेअर केला आहे. आणि आपल्या मुलीचं नाव देखील चाहत्यांना सांगितलं आहे. 

आर्या अजिंक्य रहाणे असं या चिमुकलीचं नाव असून अजिंक्यने तिचा फोटो शेअर केला आहे. मुलीचा जन्म झाला तेव्हा अजिंक्य विशाखापट्टणममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळण्यात व्यस्त होता. या सामन्यानंतर रहाणे पत्नी आणि मुलीला भेटायला गेला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Aarya Ajinkya Rahane 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

आतापर्यंत अजिंक्यने त्याच्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता. आतापहिल्यांदा अजिंक्यने त्याच्या आर्याचा फोटो शेअर केला होता. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Festivals and family make every celebration special Wishing everyone a very Happy Diwali  #HappyDiwali

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्य रहाणेने त्याची बालपणीची मैत्रिण राधिका धोपावकरसोबत 2014मध्ये लग्न केलं. तसेच 2019 च्या जुलै महिन्यात त्यांनी राधिका गरोदर असल्याची गोड बातमी सोशल मीडियावरून दिली. राधिकाच्या डोहाळ जेवणाचे काही फोटो अजिंक्यने शेअर केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Hello 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

6 नोव्हेंबर रोजी अजिंक्यने आर्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 5 ऑक्टोबरला जन्म झालेला आर्याचा फोटो सुरूवातीला शेअर केला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना रहाणेच्या मुलीचा फोटो बघण्याची उत्सुकता होती.