Raghav Ajinkya Rahane! मराठमोळ्या क्रिकेटरच्या मुलाची पहिली झलक पाहिलीत का?

राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'राघव' (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला फोटो सोशल मडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटो फॅन्सने भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

Updated: Dec 5, 2022, 09:09 PM IST
Raghav Ajinkya Rahane! मराठमोळ्या क्रिकेटरच्या मुलाची पहिली झलक पाहिलीत का? title=

Ajinkya Rahane baby boy Raghav rahane : नुकतंच मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुसऱ्यांदा बाबा झाला. यावेळी अजिंक्यची पत्नी राधिका धोपवकर (Radhika Dhopavkar) हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तर आता या चिमुकल्याचं बारसं करण्यात आलंय. राधिका आणि अजिंक्य यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव 'राघव' (Raghav rahane) असं ठेवलं आहे. राधिकाने राघवचा पहिला फोटो सोशल मडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटो फॅन्सने भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. 

राधिकाने इन्स्टाग्रामवरून बाळाचे दोन फोटो अपलोड केले आहेत. यातील पहिल्या फोटोमध्ये चिमुकला त्याची मोठी बहिण म्हणजेच आर्या रहाणेचसोबत दिसतोय. फोटोत आर्या त्याच्या छोट्या भावाला गोड पापी देतेय. तर दुसरा फोटो एकट्या राघवचा असून, तो या फोटोमध्ये गोंडस हसताना दिसतोय. 

राधिकाने या फोटोला कॅप्शन देताना म्हटलंय की, ओळख करून देतोय आर्याचा छोटा भाऊ राघव रहाणे याची. राधिकाची ही पोस्ट अजिंक्यने त्याच्या स्टोरीवरही शेअर केली आहे. अजिंकच्या दुसऱ्या बाळाची पहिली झलक पाहून चाहते मात्र फार खूश आहेत.

ऑक्टोबरमध्ये झाला बाळाचा जन्म

मुलगा झाल्याची बातमी रहाणेने आपल्या चाहत्यांनाही सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. तो म्हणाला होता, आमच्या बाळाचं मी आणि राधिकाने मिळून आनंदाने स्वागत केलं आहे. राधिका आणि नुकतंच जन्मलेलं आमचं बाळ दोघेही सुखरूप आहेत. तुमच्या प्रेमासाठी आणि आशिर्वादासाठी खूप आभारी आहोत.

अजिंक्य रहाणेने सप्टेंबर 2014 मध्ये बालमैत्रिण राधिका धोपावकरसोबत लग्न केलं होतं. अजिंक्य आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. या मुलाच्या आधी राधिकाने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता, तिचं नाव आर्या ठेवलं आहे.

आगामी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईचं (Mumbai) नेतृत्व करणार आहे. रणजी ट्रॉफीसाठी एमसीएने मुंबई संघाची (mumbai squad for Ranji Trophy) घोषणा केली आहे. रणजी स्पर्धेच्या 13 व्या मोसमाची सुरुवात ही येत्या 13 डिसेंबरपासून होणार आहे.