ऑलराऊंडर मॅक्सवेलची विस्फोटक खेळी

ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने विस्फोटक शतक ठोकलं आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 8, 2018, 10:22 AM IST
ऑलराऊंडर मॅक्सवेलची विस्फोटक खेळी title=

होबार्ट : ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने विस्फोटक शतक ठोकलं आहे. 

ऑस्ट्रेलियाने त्रिकोणीय सीरीजमध्ये दूसऱ्या टी-20 मॅचमध्ये इंग्लंडला पाच विकेटने पराभूत केलं. मॅक्सवेलने सिक्ससह आपलं दूसरं टी-20 अंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं.

बॉलिंग आणि बॅटींगमध्ये चमत्कार

इंग्लंडने डेविड मलानच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमवत 155 रन केले. ऑस्ट्रेलियाने 18.3 ओव्हरमध्ये पाच विकेट गमवत 161 रनचं टारगेट पूर्ण केलं. मॅक्सवेलने 58 बॉलमध्ये 10 फोर आणि 4 सिक्ससह 103 रनची विस्फोटक खेळी केली. याशिवाय मॅक्सवेलने दोन ओव्हर देखील टाकले. ज्यामध्ये त्याने 10 रन देऊन तीन विकेट देखील घेतले. ऑलराउंड प्रदर्शन करत तो मॅन ऑफ द मॅच ठरला.

इंग्लंडचा पराभव

ऑस्ट्रेलिया टीमने सुरुवातीला 2 झटके घेतले. डेविड वार्नर (04) आणि क्रिस लिन (00) वर आऊट झाले. मॅक्सवेलने डार्सी शॉर्टसह तीसऱ्या विकेटसाठी 78 रनची पार्टनरशिप केली. एलेक्स कॅरीने नाबाद 05 रन केले.

इंग्लंडकडून विलीने 28 रन देऊन तीन विकेट घेतले. डेविड मलानने 36 बॉलमध्ये पाच फोर आणि 2 सिक्ससह सर्वाधिक 50 रन केले अॅलेक्स हेल्सने 22 आणि कर्णधार इयोन मोर्गनने 22 रन केले. टीमने शेवटचे 6 विकेट 33 रनमध्ये गमावले.